कोरम नसताना घेतली बांधकाम समितीची सभा जि.प. प्रशासनाचा कोरम पूर्ण असल्याचा दावा : सदस्यांचा मात्र सपशेल नकार
By Admin | Updated: March 15, 2016 00:32 IST2016-03-15T00:32:46+5:302016-03-15T00:32:46+5:30
जळगाव- जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची सोमवारची मासिक सभा कोरम नसताना घेण्यात आली. विशेष म्हणजेच दोन सदस्य अनुपस्थित असताना त्यांच्या सा घेतल्याचे सांगून विषयांना मंजुरी घेण्यात आल्याची माहिती आहे. पण या वृत्ताचे जि.प.प्रशासनाने खंडन केले आहे. दुसर्या बाजूला आपण अनुपस्थित असताना आपण सही कशी करणार, असे स्पष्टीकरण उपस्थित असल्याचे दाखविलेल्या सदस्याने केले आहे.

कोरम नसताना घेतली बांधकाम समितीची सभा जि.प. प्रशासनाचा कोरम पूर्ण असल्याचा दावा : सदस्यांचा मात्र सपशेल नकार
ज गाव- जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची सोमवारची मासिक सभा कोरम नसताना घेण्यात आली. विशेष म्हणजेच दोन सदस्य अनुपस्थित असताना त्यांच्या सा घेतल्याचे सांगून विषयांना मंजुरी घेण्यात आल्याची माहिती आहे. पण या वृत्ताचे जि.प.प्रशासनाने खंडन केले आहे. दुसर्या बाजूला आपण अनुपस्थित असताना आपण सही कशी करणार, असे स्पष्टीकरण उपस्थित असल्याचे दाखविलेल्या सदस्याने केले आहे. जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले या समितीचे सभापती आहे. समितीमध्ये सभापतींसह आठ सदस्य आहेत. पैकी फक्त हर्षल पाटील व श्रावण लिंडायत उपस्थित होते. कोरमन नसतानादेखील सभा घेण्यात आली. रमेश पाटील व विद्या महाजन हेदेखील आले होते. सह्या करून ते निघून गेले, असा दावा या समितीमधील इतर सदस्यांनी केला. रमेश पाटील आलेच नाहीतयासंदर्भात सदस्य रमेश पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, आपण आलोच नाही, मग सही कशी करणार... आपण उपस्थित नसताना उपस्थिती दाखविणे चुकीचे आहे, असेही रमेश पाटील म्हणाले. विद्या महाजन यादेखील उपस्थित नव्हत्या. चौकटीनवीन इमारतीचे डायग्राम मिळेनाजिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीवर चौथा मजला बांधकामासाठी खाजगी संस्थेला स्ट्रक्चरल ऑडीटचे काम दिले आहे. या कंपनीने ऑडीट सुरू केले आहे. पण चौथा मजला बांधणे शक्य आहे की नाही... यासाठी या इमारतीचे ड्रॉइंग, डायग्राम मिळत नसल्याची माहिती आहे. नवीन इमारत ४० वर्षांपूर्वी बांधली होती. या ड्रॉइंगमध्ये इमारतीसाठी किती सिमेंट, लोखंडचा वापर झाला याची नेमकी माहिती मिळेल. पण हे ड्रॉइंग अजून सापडले नाहीत. जळगावच्या बांधकाम उपविभागात हे ड्रॉइंग शोधण्याचे काम सुरू आहे, पण संबंधित फाईल गहाळ झाल्याचा संशय आहे. नवीन इमारतीवर भांडार कक्षनवीन इमारतीवर या वर्षात भांडार कक्ष बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासंदर्भात सीईओंशी बांधकाम विभागातील चर्चा झाली. या कक्षांसाठी या अर्थसंकल्पात इमारत देखभाल, दुरुस्ती निधीमधून तरतूद होऊ शकेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी यांनी दिली. आडगाव केंद्रासाठी जागा नसताना मंजुरीआडगाव ता.यावल येथे आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात येणार आहे, परंतु या केंद्रासाठी गावात जागा नाही. पण पुढे जागा उपलब्ध झाली, पण मंजुरी नसली तर अडचण येईल. सर्वसाधारण सभा तीन महिन्यातून होत, असते, असे सांगण्यात आले.