मनपाला हवे हॉटेल व खानावळीवर नियंत्रण
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:24+5:302015-01-23T23:06:24+5:30

मनपाला हवे हॉटेल व खानावळीवर नियंत्रण
>शासनाला प्रस्ताव पाठविणार : आरोग्य समितीच्या बैठकीत निर्णयनागपूर : अन्न सुरक्षा कायद्यानुसार शहरातील सर्व हॉटेल, रेस्टारेन्ट व खानावळी इत्यादीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे. त्यामुळे कारवाई करताना कायदेशीर अडचणी येत असल्याने यावर महापालिकेचे नियंत्रण असावे. असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याचे निर्देश शुक्रवारी आरोग्य समितीच्या बैठक ीत सभापती रमेश सिंगारे यांनी दिले.सरकारच्या धोरणानुसार मनपा क्षेत्रात औषधी चिठ्ठी मुक्त योजना राबविण्यावर चर्चा करण्यात आली. हा विषय सभागृहात मांडण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील बाजारपेठेत रात्रीला साफसफाई सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांत जागृती व्हावी, यासाठी झोन स्तरावर सभा आयोजित करण्याची सूचना सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी केली. शासनाच्या आकृतीबंधानुसार आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील पदे कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विभागाला आवश्यक असलेल्या पदाबाबतचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या. जनजागृती करण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना तिवारी यांनी केली.उपसभापती साधना बरडे, समती सदस्य शीला मोहोड, विद्या कान्हेरे, श्रावण खापेकर, आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, हिवताप व हत्तीरोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, डॉ. अनिल चिव्हाणे, डॉ. शिल्पा जिचकार, अन्न निरीक्षक सुधीर फटींग आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)चौकट....सणासुदीला कत्तलखाने बंदमहाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार प्रजासत्ताक दिन, रामनवमी, महावीर जयंती, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, साधू वासवानी जयंती आदी दिवसांना कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद असतात. या व्यतिरिक्त गोकु ळाष्टमी, आंबेडकर जयंती, बली प्रतिपदा, बौद्ध पौर्णिमा, लक्ष्मीपूजन, गणेश स्थापना दिवस व गुढीपाडवा आदी सणासुदीच्या दिवसांना शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीनंतर सरकारकडे पाठविण्याचे निर्देश सभापतींनी दिले.