लोडशेडिंगकडे दुर्लक्ष करणा-या आमदारांना बनवले बंधक

By Admin | Updated: July 19, 2015 17:13 IST2015-07-19T17:07:24+5:302015-07-19T17:13:18+5:30

उत्तरप्रदेशमध्ये लोडशेडिंगच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणा-या आमदार महाशयांना या निष्काळजीपणाचा चांगलाच फटका बसला आहे.

Hostages created by MLAs who ignore loadshading | लोडशेडिंगकडे दुर्लक्ष करणा-या आमदारांना बनवले बंधक

लोडशेडिंगकडे दुर्लक्ष करणा-या आमदारांना बनवले बंधक

>ऑनलाइन लोकमत 
चंदौली (उत्तरप्रदेश), दि. १९ - उत्तरप्रदेशमध्ये लोडशेडिंगच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणा-या आमदार महाशयांना या निष्काळजीपणाचा चांगलाच फटका बसला आहे. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेले आमदार व नगरसेवकांना स्थानिकांनी चक्क खुर्चीला बांधून बंधक बनवून ठेवले. अखेर आमदारांनी या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची सुचना केली व आमदार महोदयांची सुटका झाली. 
उत्तरप्रदेशमधील चंदौली येथे लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले असून यासंदर्भात त्यांनी वारंवार स्थानिक नगरसेवक कयामुद्दीन व बसपाचे आमदार बब्बनसिंह चौहान यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र या नेत्यांनी नागरिकांच्या तक्रारीची फारशी दखल घेतली नव्हती. स्थानिक नेत्यांविरोधात नागरिकांच्या मनात असंतोष खदखदू लागला व याचा स्फोट ईदनिमित्त झाला. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार बब्बनसिंह व कयामुद्दीन हे चंदौली परिसरात आले होते. आमदार व नगरसेवकांकडे लोडशेडिंगची तक्रार केल्यावर नागरिकांनी या दोघांनाही चक्क खुर्चीला बांधून ठेवले. हा सर्व गोंधळ तब्बल दिड तास सुरु होता. अखेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आमदारांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. आमदारांनी लोडशेडिंगवर तातडीने तो़डगा काढू असे आश्वासन दिल्यावर ग्रामस्थांनी दोघांची सुटका केली. मात्र नागरिकांच्या या 'शॉक'मुळे नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले ऐवढे मात्र नक्की. 

Web Title: Hostages created by MLAs who ignore loadshading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.