खाजगी हॉस्पिटलच्या मनमानीमुळे १०४ क्रमांकाची योजना संकटात फोन कॉलवर वाजवी दरात रक्त उपलब्ध : हॉस्पिटलचा असहाकार

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:34+5:302015-07-10T23:13:34+5:30

पुणे : तातडीने रक्त हवंय.. तर १०४ या टोल फ्रि क्रमांकावर फोन करा अन वाजवी दरात रक्त मिळवा ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. मात्र खाजगी हॉस्पिटलचालक व रक्तपेढयांचे यामुळे नुकसान होत असल्याने त्याव्दारे रक्त घेण्यास हॉस्पिटलकडून रक्त घेण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

Hospital's 104-level plan for the arbitration of private hospital due to inadequate blood on phone call available: hospital non-casualty | खाजगी हॉस्पिटलच्या मनमानीमुळे १०४ क्रमांकाची योजना संकटात फोन कॉलवर वाजवी दरात रक्त उपलब्ध : हॉस्पिटलचा असहाकार

खाजगी हॉस्पिटलच्या मनमानीमुळे १०४ क्रमांकाची योजना संकटात फोन कॉलवर वाजवी दरात रक्त उपलब्ध : हॉस्पिटलचा असहाकार

णे : तातडीने रक्त हवंय.. तर १०४ या टोल फ्रि क्रमांकावर फोन करा अन वाजवी दरात रक्त मिळवा ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. मात्र खाजगी हॉस्पिटलचालक व रक्तपेढयांचे यामुळे नुकसान होत असल्याने त्याव्दारे रक्त घेण्यास हॉस्पिटलकडून रक्त घेण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
महराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेतर्फे जीवन अमृत योजना (ब्लड ऑन कॉल) सुरू करण्यात आली. गरजू रूग्णास दर्जेदार, सुरक्षित रक्त वाजवी दरात तातडीने उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उदद्ेश आहे. राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये ७ जानेवारी २०१४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्य सेवा संचालक सतीश पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे ब्लड ऑन कॉल योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबदद्ल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, 'खाजगी हॉस्पिटलकडून या योजनेला सहकार्य मिळत नसल्याने त्याचा प्रतिसाद कमी आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यामध्ये २०७ ठिकाणी ब्लड स्टोरेज उभारले जात आहेत. त्यापैकी १२४ ठिकाणी ते कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित ठिकाणांचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यामुळे गर्भवती महिला, अपघातग्रस्त पेशंट यांना तातडीने रक्त उपलब्ध होणे सहज शक्य होणार आहे.'
१०४ क्रमांकावर दुरध्वनी केल्यानंतर संबंधित जिल्हयाच्या रक्तपेढीवर दूरध्वनी हस्तांतरीत करण्यात येतो. त्यानंतर ४० किमी किंवा एक तासाच्या अंतरावरील रूग्णालयांना शीतसाखळीतून रक्त व रक्त घटक उपलब्ध करून दिले जाते. मात्र पेशंट रक्त हवे असल्यास १०४ क्रमांकावरून रक्त मागण्यास हॉस्पिटलकडून मज्जाव केला जात आहे. हॉस्पिटलमधील रक्तपेढीतूनच रक्त घ्यावे याची जबरदस्ती पेशंवट केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

चौकट
शिशूवरील उपचारासाठी प्रगत सॉफ्टवेअर
बाळ जन्मल्यानंतर त्यामध्ये काही गंभीर आजार आढळून आले तर त्याला पुढील उपचारासाठी पाठविले जाते. मात्र बर्‍याचदा नातेवाईकांकडून उपचार केले जात नाहीत. बाळावर नातेवाईकांनी उपचार केले की नाही, त्या बाळाची स्थिती कशी आहे याबबातचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे बालमृत्यु रोखण्यात मोठी मदत होऊ शकेल अशी माहिती अतिरिक्त आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी दिली.

Web Title: Hospital's 104-level plan for the arbitration of private hospital due to inadequate blood on phone call available: hospital non-casualty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.