शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरकडून रुग्णाला बेदम मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 11:55 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सवाई मानसिंह मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला डॉक्टर बेडवर चढून बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

ठळक मुद्देरुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला डॉक्टरने बेदम मारहाण केली आहे. राजस्थानमधील जयपूरच्या प्रसिद्ध सवाई मानसिंह मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडलीमानवाधिकार आयोगाने रुग्णालय प्रशासनाला 25 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

जयपूर - संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बहुतांश वेळा रुग्णालयाची तोडफोड केल्याच्या तसेच डॉक्टरांना मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र जयपूरमधील एका रुग्णालयात याउलट एक घटना घडली आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला डॉक्टरने बेदम मारहाण केली आहे. राजस्थानमधील जयपूरच्या प्रसिद्ध सवाई मानसिंह मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली असून या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सवाई मानसिंह मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला डॉक्टर बेडवर चढून बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने रुग्णालय प्रशासनाला 25 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमधील चांदपोल बाजार परिसरातील रहिवासी मुबारिक (30) याला 1 जूनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

मुबारिक विषारी औषध प्यायला होता. तसेच तो पोटाच्या विकाराने आजारी असल्याने त्याच्यावर रुग्णालयातील डॉक्टर काही दिवसांपासून उपचार करत होते. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या काही वैद्यकीय तपासण्यांसाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी महिला डॉक्टर गेल्या असता रुग्ण हिंसक झाला. त्याने डॉक्टरला मारहाणही केली. तिथे उपस्थित अन्य एक पुरुष डॉक्टर आणि नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही रुग्णाने मारहाण केली. 

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डी. एस. मीणा यांनी 'सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फेरफार झाल्याची शक्यता आहे. रुग्णालयातील समिती या घटनेची चौकशी करणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल राजस्थान मानवाधिकार आयोगाला पाठवण्यात येईल' अशी माहिती दिली आहे. तसेच रुग्णावर योग्य उपचार करण्यात आले असून लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल असंही मीणा यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने रुग्णालय प्रशासनाला 25 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर रुग्णालयातील मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर