रुग्णालयाने प्रवेश नाकारला, मुलाने पित्याच्या खांद्यावर सोडले प्राण
By Admin | Updated: August 30, 2016 14:50 IST2016-08-30T14:34:46+5:302016-08-30T14:50:55+5:30
पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन जावा लागल्याची घटना ताजी असताना आता उत्तरप्रदेशातील एका सरकारी रुग्णालयाच्या असंवेदनशीलतचे उदहारण समोर आले आहे.

रुग्णालयाने प्रवेश नाकारला, मुलाने पित्याच्या खांद्यावर सोडले प्राण
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. ३० - ओडिसामध्ये रुग्णालयाने गाडी देण्यास नकार दिल्याने एका आदिवासी व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन जावा लागल्याची घटना ताजी असताना आता उत्तरप्रदेशातील एका सरकारी रुग्णालयाच्या असंवेदनशीलतचे उदहारण समोर आले आहे.
रुग्णालयाने कोणत्याही प्रकारची मदत न केल्याने अखेर 'त्या' १२ वर्षाच्या मुलाने पित्याच्या खांद्यावरच आपले प्राण सोडले. सुनील कुमार यांचा मुलगा अंश तापाने फणफणत होता. सुनील कुमार त्याला घेऊन कानपूरच्या लाला लजपत राय रुग्णालयात गेले.
पण रुग्णालय प्रशासनाने अंशला दाखल करुन घेण्यास नकार देत त्याला बाल रुग्णलायात जाण्यास सांगितले. अंशची प्रकृती नाजूक असूनही रुग्णालयाने रुग्णवाहिका किंवा स्ट्रेचर अशी कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सुनील कुमार मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने निघाले. मात्र रस्त्यातच अंशने पित्याच्या खांद्यावर प्राण सोडले.
आणखी वाचा
रविवारी रात्रीपासून अंश तापाने फणफणत होता. ते प्रथम मुलाला स्थानिक डॉक्टरकडे घेऊन गेले. औषध घेतल्यानंतर ताप कमी होण्याऐवजी जास्त वाढल्याने ते शहरातील मोठया एलएलआर रुग्णालयात घेऊन गेले. माझ्या मुलीची स्थिती अतिशय वाईट होती.
त्याच्यावर उपचार करावे म्हणून मी डॉक्टरांच्या हाता-पाया पडलो. पण तीस मिनिट त्यांनी वाया घालवली व मला बाल रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असताना अंशने सुनील कुमार यांच्या खांद्यावर आपले प्राण सोडले.