घोडेगावच्या क्रॉसकंट्री स्पर्धेत
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:53+5:302015-08-20T22:09:53+5:30
सुवर्णा शेगर व नीलेश चव्हाण विजेते

घोडेगावच्या क्रॉसकंट्री स्पर्धेत
स वर्णा शेगर व नीलेश चव्हाण विजेतेघोडेगाव : येथील बी़ डी. काळे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या पुणे जिल्हा आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत मुलीच्या ६ किलोमीटरमध्ये घोडेगावच्या सुवर्णा शेगरने, तर मुलांच्या १२ किलोमीटरमध्ये जुन्नरच्या नीलेश चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच, विद्या शेगर (घोडेगाव), श्वेता जाधव (नारायणगाव) तर मुलांमध्ये प्रतीक जगताप (जेजुरी) व महेबूब दरवेशी (आळे) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले़ मुलींचे सांघिक विजेतेपद यजमान बी़ डी. काळे महाविद्यालय घोडगाव यांनी, तर उपविजेतेपद शारदानगर यांनी मिळविले. तसेच, मुलांमध्ये विजेतेपद जुन्नरने, तर उपविजेतेपद घोडेगाव संघाने मिळविले़ या स्पर्धेत घोडगावच्या नम्रता बोनवटे, विश्वास काळे, विलास वाजे यांची जिल्हा संघात निवड करण्यात आली़या स्पर्धेचा उद्घाटन व बक्षीस समारंभ घोडेगाव महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले राष्ट्रीय खेळाडू बेंगाल वारीयर्स संघाचे कबड्डीपटू विकास काळे यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत २८ महाविद्यालयांच्या १४३ खेळाडूंनी सहभाग घेतला़ या स्पर्धेच्या प्रसंगी प्राचार्य इंद्रजित जाधव, जिल्हा सचिव डॉ़ रमेश गायकवाड व क्रीडा विभागाचे इतर पदाधिकारी हजर होते़ या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष कैलासशेठ काळे, सखाराम पा. काळे, सुरेशशेठ काळे, सचिव जयसिंराव काळे व इतर पदाधिकार्यांनी केले. या स्पर्धेचे संयोजन क्रीडा संचालक भाऊसाहेब थोरात यांनी केले़ 20082015-ॅँङ्मि-11 घोडेगाव येथे झालेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेचे उद्घाटन करताना कबड्डीपटू विकास काळे.०००