शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:54 IST

Tamil Nadu Gangrape: नोकरी सोडली म्हणून एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

नोकरी सोडल्याच्या रागातून कंत्राटदाराने दोन अल्पवयीन मुलाच्या मदतीने असाम येथील एका महिलेवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली. तामिळनाडूच्या श्रीवाकुंटम परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, अशीही ग्वाही पोलिसांनी व्यक्त केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका ठिकाणी नोकरी करत होती. काही वैयक्तिक कारणांमुळे तिने नुकतीच आपली नोकरी सोडली. मात्र, तिने नोकरी सोडल्याचा राग संबंधित कंत्राटदाराला होता. दाम्पत्य रिक्षाने केरळला जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि वाटेतच त्यांना अडवले. आरोपींनी आधी पतीला बेदम मारहाण केली आणि त्याला एका झाडाला घट्ट बांधून ठेवले. त्यानंतर पतीसमोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. यावेळी पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निर्जनस्थळ असल्याने त्यांच्या मदतीला कुणीही आले नाही.

आरोपींनी या कृत्यानंतर पीडित दांपत्याला जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिला आणि तिच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे. केवळ नोकरी सोडली म्हणून एखाद्या महिलेच्या अब्रूला हात घालण्यापर्यंत आरोपींची मजल गेल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife Gang-Raped in Front of Husband for Quitting Job

Web Summary : In Tamil Nadu, a contractor and two minors gang-raped a woman in front of her husband because she quit her job. The husband was tied to a tree. Police are investigating this heinous crime and have assured justice.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडू