शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; बस-डीसीएमची जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू, 21 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 11:58 IST

बसमध्ये जवळपास 50 प्रवासी बसले होते. एक्स्प्रेसवेवर 61 किलोमीटरवर पोहोचल्यावर बस डीसीएमला धडकली आणि रेलिंग तोडून खाली पडली.

आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस आणि डीसीएमची जोरदार धडक झाली. यामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 21 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा लखनौ एक्स्प्रेसवेवर बुधवारी पहाटे 4.30 वाजता  नगला खंगार पोलीस स्टेशन परिसरात एक बस लुधियानाहून रायबरेलीकडे जात होती

बसमध्ये जवळपास 50 प्रवासी बसले होते. एक्स्प्रेसवेवर 61 किलोमीटरवर पोहोचल्यावर बस डीसीएमला धडकली आणि रेलिंग तोडून खाली पडली. अपघात होताच प्रवाशांनी मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी प्रवाशांना वाचवण्यासाठी धावू लागले. त्याची माहिती तत्काळ यूपीडा आणि नगला खंगार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या पथकांनी जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यास सुरुवात केली.

एसपी देहात रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य वेगाने सुरू असून 21 जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. 19 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना दुसऱ्या बसने पाठवले आहे आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांची माहिती घेतली जात आहे.

बस खाली पडताच प्रवाशांचे सामान इकडे तिकडे पडले. प्रवासी जखमी झाल्यानंतरही त्याला आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी होती. पोलीस आल्यानंतर प्रवाशांना सुरक्षित वाटले. बसमधील महिला व लहान मुले जखमी झाल्यानंतर आरडाओरडा झाला. त्यांना प्रथम लोकांनी बाहेर काढले. अपघात झाला तेव्हा बहुतांश प्रवासी झोपेत होते. बस आणि डीसीएमची धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Accidentअपघात