शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसली भरधाव बुलेरो; तिघांचा मृत्यू, २२ जखमी, चालकाला पकडून दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:31 IST

छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघातात तीन गणेश भक्तांचा जागीच मृत्यू झाला.

Chhattisgarh Accident:छत्तीसगडमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं. भरधाव गाडी मिरवणुकीत घुसल्याने तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत. यावरुन गाडीचा वेग किती होता याचा अंदाज लावता येईल. जखमींमध्ये अनेक मुले आणि महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तर गंभीर जखमींना उपचारासाठी अंबिकापूर वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. 

या अपघातानंतर तिथल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. जमावाने गाडीच्या चालकाला पकडून बेदम मारहाण केली ज्यामुळे तोही जखमी झाला. पोलिसांनी आरोप चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

छत्तीसगडमधील जशपूरमध्ये घडलेल्या या अपघात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २२ जण गंभीर जखमी झाले. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका अनियंत्रित गाडीने अनेक भाविकांना चिरडले. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जशपूरमधील चरैदंड बागीचा राज्य महामार्गाजवळ गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मिरवणूक काढली होती. विसर्जनासाठी सुमारे १५० भाविकांची गर्दी होती. त्यावेळी अचानक एक भरधाव बोलेरो अनियंत्रित होऊन गर्दीत घुसली आणि अनेकांना चिरडले.

या अपघातात एका महिलेसह ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. १९ वर्षीय अरविंद करकेट्टा, १७ वर्षीय विपिन आणि ३२ वर्षीय खिरोवती अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या जमावाने बोलेरो चालकाला बेदम मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.  जखमी झालेल्या २२ लोकांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातून १८ जणांना अंबिकापूर रुग्णालयात हलवण्यात आले आहे, ज्यात कारचा चालकही आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडAccidentअपघातGanpati Festivalगणपती उत्सव २०२५