मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सागर-झांसी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे चार जवान शहीद झाले, तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुरैना BDS पथकाचे जवान बालाघाट येथील आपली ड्युटी संपवून परत मुरैनाकडे परतत होते. सागर जिल्ह्यातील बांदरी आणि मालथौन दरम्यान असलेल्या झीकनी घाटीजवळ त्यांच्या पोलीस वाहनाची कंटेनर ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भयंकर होता की BDS पथकाच्या वाहनाचा पूर्ण चुराडा झाला आहे. अपघात पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झाला.
या अपघातात चार जवानांचा जागीच मृत्यू झाला. शहीद झालेल्या जवानांमध्ये प्रधुमन दीक्षित, अमन कौरव, चालक परमलाल तोमर (सर्व रा. मुरैना) आणि डॉग मास्टर विनोद शर्मा (रा. भिंड) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत राजीव चौहान गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने सागर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवानांसोबत असलेला श्वान मात्र सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेनंतर शोककळा
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. कंटेनर आणि पोलीस वाहन एकमेकांवर आदळल्यामुळे वाहने अनियंत्रित झाली असावीत, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे मुरैना आणि भिंड जिल्ह्यांवर शोककळा पसरली आहे. शहीद जवानांचे पार्थिव मालथौन येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
Web Summary : In Madhya Pradesh, a container truck collision killed four bomb disposal squad members and injured one. The accident occurred on the Sagar-Jhansi highway while the team was returning from duty. A dog with the team survived. Investigations are underway, and the area is in mourning.
Web Summary : मध्य प्रदेश में सागर-झांसी राजमार्ग पर कंटेनर ट्रक की टक्कर में बम निरोधक दस्ते के चार जवान शहीद हो गए और एक घायल हो गया। टीम ड्यूटी से लौट रही थी। दस्ते के साथ एक कुत्ता जीवित बचा। जांच जारी है, और क्षेत्र में शोक है।