हुडहुड चक्रीवादळ धडकले, विशाखापट्टणममध्ये दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: October 12, 2014 14:52 IST2014-10-12T12:31:07+5:302014-10-12T14:52:15+5:30
हुडहुड चक्रीवादळ १८० किलोमीटर प्रति तास या वेगाने विशाखापट्टणम येथे धडकले आहे. मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यामध्ये आत्तापर्यंत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.

हुडहुड चक्रीवादळ धडकले, विशाखापट्टणममध्ये दोघांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १२ - हुडहुड चक्रीवादळ १८० किलोमीटर प्रति तास या वेगाने विशाखापट्टणम येथे धडकले आहे. मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यामध्ये आत्तापर्यंत दोघा जणांचा मृत्यू झाला असून हे वादळ आता आणखी भयावह रुप धारण करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
हुडहुड हे चक्रीवादळ सकाळी अकराच्या सुमारास विशाखाटपट्टणम येथे धडकले. दुपारी एकच्या सुमारास वादळाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा येत असून मुसळधार पाऊसही पडत आहे. वा-यामुळे झाड पडून विशाखापट्टणम व श्रीकाकुलम येथे दोघांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे अनेक दुकांनांचे पत्रे व शटर उडून गेल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, या वादळाचा इशारा मिळाल्यास केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवल्या आहेत. आंध्रप्रदेश आणि ओधिशा येथील सुमारे आठ लाख नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तर केंद्र सरकारचे अधिकारीही राज्य सरकारशी संपर्कात आहे. वादळाचा फटका बसलेल्या भागांमध्ये जीवनावश्यक वस्तू व औषधं पाठवण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत वादळ शमेल अशी शक्यता आहे.