रिक्षा लावण्यावरून तरुणावर कोयत्याने हल्ला पिंप्राळा हुडकोतील घटना : दोन जणांना अटक, एक फरार

By admin | Published: June 3, 2016 06:56 PM2016-06-03T18:56:41+5:302016-06-03T18:56:41+5:30

जळगाव: अंगणात रिक्षा लावण्याच्या कारणावरून दीपक गजानन ठाकूर (वय २२) व भूषण ठाकरे (दोन्ही रा.हुडको, पिंप्राळा) या दोन्ही भावांना शफी शेख फयाजोद्दीन शेख, आसिफ शेख रफी शेख व अन्नू उर्फ काल्या अलाउद्दीन शेख (रा.पिंप्राळा) या तिघांनी हॉकीस्टीक व कोयत्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजता पिंप्राळ्यात घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hoodak incident: Two people arrested, one absconding | रिक्षा लावण्यावरून तरुणावर कोयत्याने हल्ला पिंप्राळा हुडकोतील घटना : दोन जणांना अटक, एक फरार

रिक्षा लावण्यावरून तरुणावर कोयत्याने हल्ला पिंप्राळा हुडकोतील घटना : दोन जणांना अटक, एक फरार

Next
गाव: अंगणात रिक्षा लावण्याच्या कारणावरून दीपक गजानन ठाकूर (वय २२) व भूषण ठाकरे (दोन्ही रा.हुडको, पिंप्राळा) या दोन्ही भावांना शफी शेख फयाजोद्दीन शेख, आसिफ शेख रफी शेख व अन्नू उर्फ काल्या अलाउद्दीन शेख (रा.पिंप्राळा) या तिघांनी हॉकीस्टीक व कोयत्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजता पिंप्राळ्यात घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक ठाकूर हा रिक्षा चालक आहे. गुरुवारी रात्री व्यवसाय करुन तो घरी आला. शेजारच्याच्या अंगणात रिक्षा लावून खाट टाकली, त्यास शफी, काल्या व आसिफ यांनी विरोध केला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. आसिफने कोयत्याने तर काल्याने हॉकिस्टीकने ठाकूरला मारहाण केली. हा वाद सोडविण्यासाठी गेेलेल्या भूषणलाही तिघांनी मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणी शफी व आसिफ याला अटक करण्यात आली आहे.
फुलं विक्रेत्याला धमकी
ख्वॉजामियॉ चौकात फुलं विक्री करणारे खुर्शीद शेख यांना उसनवारीच्या पैशावरून अख्तर शेख याने शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश नगरातील वासंती गोविंदराव मिस्तरी (वय ६२) या वृध्देस अंगणातून गेल्याचे वाईट वाटून कल्पना अर्जुन बाविस्कर, सोनु अर्जुन बाविस्कर, अर्जुन भोजू बाविस्कर व राजू सोनवणे यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार जिल्हा पेठला देण्यात आली आहे.

Web Title: Hoodak incident: Two people arrested, one absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.