यकृत दान करणा-या मुलीचा गौरव

By Admin | Updated: November 18, 2014 23:40 IST2014-11-18T23:40:57+5:302014-11-18T23:40:57+5:30

जयपूरच्या सिमरन शर्मा या १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे वडील डॉ. राकेश शर्मा यांना यकृताचा गंभीर आजार झाला होता.

The honor of a girl donating liver | यकृत दान करणा-या मुलीचा गौरव

यकृत दान करणा-या मुलीचा गौरव

जयपूर : आजारी पित्याला आपल्या यकृताचा ६५ टक्के भाग दान केलेल्या विद्यार्थिनीला राज्यात अवयवदान जागरूकता कार्यक्रमात व मुलगी वाचवा अभियानात सहभागी करून घेण्यासाठी राजस्थान सरकारने तिची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
जयपूरच्या सिमरन शर्मा या १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे वडील डॉ. राकेश शर्मा यांना यकृताचा गंभीर आजार झाला होता. काही दिवसांआधी चेन्नई येथे त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. यात सिमरनने आपले ६५ टक्के यकृत वडिलांना दान केले.
राजस्थानचे आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी लागलेल्या ६७ लाख रुपयांच्या खर्चाचा भार सरकार उचलणार आहे. १७ वर्षांच्या सिमरनने आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना तिच्या वडिलांच्या आजाराची माहिती दिली. तिचे वडील अद्यापि रुग्णालयात आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: The honor of a girl donating liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.