शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

तरुणी अन् ₹2000 च्या नादात देशाच्या सुरक्षिततेशी खेळ; पाकिस्तानला पाठवले 25 सबमरीन, वॉरशिपचे स्केच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:32 AM

Honey Trap : चौकशीदरम्यान काय म्हणाला कल्पेश...?

भारतीय नौदलाशी संबंधित गुप्त माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तान हनी ट्रॅपचा वापर करत आहे. नुकतेच, महाराष्ट्र एटीएसने माझगाव डॉक येथे कार्यरत असलेल्या कल्पेश बायकर नावाच्या 30 वर्षीय तरुणाला पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) एजंट्स सोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

आरोपी कल्पेशच्या अकाउंटमध्ये PIO च्या एजन्ट्सने 2000 रुपये पाठवले होते आणि हे पैसे पाठवण्यासाठी नवी दिल्लीतील किरन पाल सिंह नावाच्या व्यक्तीच्या बँक अकाउंटचा वापर करण्यात आला होता. सिंह SBI मध्ये काम करत होते. ते निवृत्त आहेत. सिंह यांनी ATS ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ते 2000 रुपये वेल नोन “बिटकॉइन एक्सचेन्ज आणि अल्टकॉइन क्रिप्टो एक्सचेन्ज अॅप्लिकेशन”वर डॉलर खरेदी करण्यासाठी दिले होते आणि हे पैसे कल्पेशच्या अकाउंटमध्ये कसे गेले याची माहिती त्यांना नाही, असे चौकशीतून समोर आले आहे.

25 सबमरीन आणि वॉरशिपचे स्केच केले शेअर -या तपासात, एजन्सींना मोठी माहिती मिळाली आहे. पाकिस्तानी ISI एजंट्सकडून आपली ओळख लपविण्यासाठी “बिटकॉइन एक्सचेन्ज आणि अल्टकॉइन क्रिप्टो एक्सचेन्ज अॅप्लिकेशन”चा कशा पद्धतीने वापर केला जात आहे आणि भारताची संवेदनशील माहिती मिळवत आहेत, हे एजन्सींच्या लक्षात आले आहे. महत्वाचे म्हणजे, कल्पेशने PIO च्या महिला एजन्ट सोनाली शर्माला अटकेपूर्वीपर्यंत 25 सबमरीन आणि वॉरशिपचे स्केच्स शेअर केले होते. 

चौकशीत कल्पेशने काय सांगिलं? - चौकशी दरम्यान कल्पेश म्हणाला, त्याचा 29 वा वाढदिवस होता, तेव्हा त्याने सोनाली शर्मा (PIO ची महिला एजन्ट)कडे वाढदिवसाचे गिफ्ट मागत, तीने त्या दिवशी प्रत्यक्ष भेटावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्या दिवशी सोनालीने त्याला काही बहाणा करत भेटण्यास नकार दिला आणि पुन्हा भेटू असे सांगितले. तसेच, तिने कल्पेशच्या बँक अकाउंटमध्ये सिंह यांच्या अकाउंटवरून 2000 रुपयेही पाठवले आणि या पैशांतून शॉपिंग करायला सांगितले. 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदल