इंदुमती गर्ल्स हायस्कूलमध्ये महापौर, उपमहापौरांचा सत्कार
By admin | Updated: December 22, 2016 23:13 IST
कोल्हापूर : जुना राजवाडा परिसरातील प्रिन्सेस इंदुमतीदेवी गर्ल्स हायस्कूलतर्फे महापौर हसिना फरास व उपमहापौर अर्जुन माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एन. सी. सी.च्या छात्रांनी मानवंदना देऊन महापौर, उपमहापौरांचे स्वागत केले.
इंदुमती गर्ल्स हायस्कूलमध्ये महापौर, उपमहापौरांचा सत्कार
शेगाव (जि. बुलडाणा) : शेतकरी, भूमीहीन, शेतमजूर यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी शेगावात भूमिमुक्ती मोर्चाकडून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.पाळा येथील आदिवासी मुलीचे लैंगिक शोषण करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, भूमिहीन शेतकर्यांची व मजुरांची कर्जातून मुक्ती व्हावी, आदिवासी वन हक्क पारंपरिक वन निवासी कायदा २००६-२००८ नुसार भूमिहीनांच्या उत्थानासाठी त्यांना वनजमिनी देण्यात याव्यात, यासह एकूण १५ मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी शेगावात भूमिमुक्ती मोर्चाचे प्रमुख प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात रेल्वेस्थानकावर आंदोलन करण्यात आले. त्यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन फलाटावर उभ्या असलेल्या गीतांजली एक्स्प्रेसमोर ठाण मांडून घोषणाबाजी केली. या वेळी रेल्वे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले व गीतांजलीचा मार्ग मोकळा करून दिला. (शहर प्रतिनिधी)