‘मदरसे बनताहेत समलैंगिकांचे अड्डे’
By Admin | Updated: May 27, 2015 23:57 IST2015-05-27T23:57:02+5:302015-05-27T23:57:02+5:30
देशातील मदरशांमध्ये समलैंगिकतेचा बोलबाला आहे. मौलांनाचाही त्यात सहभाग असून, या मदरशांवर बंदी घातली तरच मुस्लिम तरुणांचे भविष्य सुधारेल,

‘मदरसे बनताहेत समलैंगिकांचे अड्डे’
नवी दिल्ली : देशातील मदरशांमध्ये समलैंगिकतेचा बोलबाला आहे. मौलांनाचाही त्यात सहभाग असून, या मदरशांवर बंदी घातली तरच मुस्लिम तरुणांचे भविष्य सुधारेल, असा गौप्यस्फोट अलिगड मुस्लिम विद्यापीठातील एका प्राध्यापकाने केल्यानंतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांत संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान, वसीम राजा नामक या प्राध्यापकाने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचा इन्कार केला आहे. आपण असे काहीही बोललो नाही. आपला फोन हॅक करण्यात आला, असा त्यांचा दावा आहे. वसीम राजा मागील ३० वर्षांपासून विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राजा यांनी व्हॉटस् अॅपवर एका वृत्तवाहिनीला पाठविलेल्या संदेशात देशातील मदरसे अधर्म आणि समलैंगिकांचे अड्डे बनत चालले असून मौलांनाही यात सामील आहेत. या सर्व मदरशांवर बंदी घातली तरच मुस्लिम युवकांचे भविष्य बदलेल, असे लिहिल्याचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)