मेक्सिकोतील अपहृत 43 मुलांची हत्या
By Admin | Updated: November 9, 2014 02:28 IST2014-11-09T02:28:55+5:302014-11-09T02:28:55+5:30
सहा आठवडय़ांपासून बेपत्ता असलेल्या 43 विद्याथ्र्याची हत्या केल्याची व त्यांचे मृतदेह जाळून दुर्गम भागातील नदीत फेकून दिल्याची कबुली संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या गुंडांनी दिली आहे.

मेक्सिकोतील अपहृत 43 मुलांची हत्या
संशयितांची कबुली : महापौरांसह 7क् जण ताब्यात, देशवासीयांच्या संतापाचा उद्रेक, जगभरातून निंदा
मेक्सिको सिटी : सहा आठवडय़ांपासून बेपत्ता असलेल्या 43 विद्याथ्र्याची हत्या केल्याची व त्यांचे मृतदेह जाळून दुर्गम भागातील नदीत फेकून दिल्याची कबुली संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या गुंडांनी दिली आहे. या प्रकरणी इगुला शहराच्या महापौरांसह 7क् जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही मुले 26 सप्टेंबरपासून बेपत्ता होती. त्यांचा शोध घेण्याच्या मागणीसाठी देशभर उग्र आंदोलन पेटल्यानंतर प्रशासनाने व्यापक शोध सुरू केला होता. मुलांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आल्यामुळे देशात तीव्र असंतोष उफाळला असून राष्ट्राध्यक्ष एनरिक पेन निएटो यांनी या हत्याकांडाला जबाबदार असलेल्यांना कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले आहे.
मेक्सिकोचे महाधिवक्ता जिसस मुरिल्लो यांनी सांगितले की, काही पोलिसांनीच या मुलांना आपल्याकडे सोपविल्याचा दावा या घटनेत सहभागी टोळीच्या कथित सदस्यांनी केला आहे. मेक्सिकोच्या दक्षिणोकडील इगुला शहरात पोलिसांशी वाद झाल्यानंतर 26 सप्टेंबरपासून हे विद्यार्थी बेपत्ता झाले होते.
मेक्सिकोच्या गरेरो प्रांताच्या इगुला शहरात विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एका अध्यापक विद्यालयातील हे विद्यार्थी येथे आले होते. महापौरांच्या पत्नी या आंदोलनाला संबोधित करणार होत्या. यात अडथळा आणत असल्याच्या कारणावरून विद्याथ्र्याना हुसकावून लावण्याचे आदेश महापौरांनी पोलिसांना दिले होते. यावेळी चकमक होऊन पोलिसांनी गोळीबार केला. यात सहा जण ठार झाले. यानंतर पोलिसांनी विद्याथ्र्याना आपल्या वाहनात कोंबून नेल्याचे प्रत्यक्षदर्श्ीनी सांगितले. या चकमकीपासूनच हे विद्यार्थी बेपत्ता होते.
मादक पदार्थ तस्करी करणा:या ‘गुरेरोस युनिडोस’ नामक टोळीतील काही सदस्यांना मुले बेपत्ता झाल्याप्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतूनच मुलांची हत्या झाल्याचे उघड झाले. दरम्यान, नदीच्या परिसरात मानवी मृतदेहांचे अवशेष असलेली सहा पोती सापडली.
मुरिल्लो म्हणाले, जळालेल्या मृतदेहांची ओळख पटविणो कठीण असून त्यांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. यानंतरच हे मृतदेह बेपत्ता मुलांचे आहेत किंवा नाही हे निष्पन्न होईल.
विद्यार्थी हत्याकांड उघड झाल्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेन निएटो यांना देशभरातून मोठय़ा असंतोषास तोंड द्यावे लागत आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची घोषणा राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. नदीतून हाती लागलेल्या सहा पोत्यांतील मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी ते ऑस्ट्रियाला पाठविण्याचा निर्णय मेक्सिकोने घेतला असून, यास किती वेळ लागेल हे सांगण्यास मुरिल्लो यांनी असमर्थता दर्शविली.
पोत्यात सापडलेले मृतदेह हे मुलांचेच असल्याचे सांगण्यास सरकार असमर्थता दर्शवीत आहे. दुसरीकडे मुलांच्या पालकांकडून मात्र सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. ‘आमची मुले जिवंत असल्याची आशा आता संपुष्टात आली आहे,’ अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली.
पोलिसांनी या हत्याकांडप्रकरणी 7क् हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले असून, यात इगुलाच्या महापौरांसह त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे.
(वृत्तसंस्था)
4सरकारने संशयित गुन्हेगारांकडून मिळालेली चित्रफीत प्रसिद्ध केली असून यात मुलांना ट्रकमधून इगुलानजीकच्या कोकिला येथील डोंगरावर घेऊन जाण्यात आल्याचे दिसते. येथे दाखल होण्यापूर्वीच जवळपास 15 मुलांचा मृत्यू झाला होता, असा दावा संशयित गुन्हेगारांनी केला.
4विद्याथ्र्याना गोळ्य़ा घालून मारल्यानंतर क्रूरकम्र्यानी टायर, लाकडे पेटवून त्यात मुलांना टाकले. जवळपास 14 तास ही आग धुमसत होती. ‘मध्यरात्री पेटविण्यात आलेली ही आग दुस:या दिवशी दुपारी दोन वाजेर्पयत सुरू होती,’ असे सरकारी सूत्रंनी सांगितले.
4चित्रफितीत मुलांच्या मृतदेहांचे अवशेष गुन्हेगार पोत्यात भरत असताना दिसते. दरम्यान, किती मुलांना येथे आणण्यात आले होते याबद्दल माहिती नसल्याचे सांगत संशयित गुन्हेगारांनी यात सुमारे 4क् मुले असल्याचा दावा केला.