नवी दिल्ली: देशात सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर ठग आता फेक लिंक किंवा बनावट अॅप्सच्या माध्यमातून नव्हे, तर मोबाईलमधील एक सर्वसामान्य फीचर वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. या नव्या प्रकाराला कॉल फॉरवर्डिंग स्कॅम असे म्हटले जाते. यामुळे बँक खात्यांपासून सोशल मीडिया अकाउंटपर्यंत सर्व काही धोक्यात येऊ शकते.
या गंभीर धोक्याबाबत गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या Indian Cyber Crime Coordination Centre (I4C) ने देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.
काय आहे कॉल फॉरवर्डिंग स्कॅम?
कॉल फॉरवर्डिंग हे मोबाईलमधील एक फीचर आहे. युजर स्वतः येणाऱ्या कॉल्स दुसऱ्या नंबरवर वळवू शकतो. मात्र, सायबर ठग याच फीचरचा गैरवापर करून लोकांचे कॉल आणि OTP स्वतःकडे वळवत आहेत. I4C च्या माहितीनुसार, ठग लोकांना फसवण्यासाठी अत्यंत साधी आणि विश्वासार्ह पद्धत वापरत आहेत.
कसा रचला जातो कट?
या फसवणुकीची सुरुवात बहुतेक वेळा एका साध्या कॉल किंवा SMS पासून होते. ठग स्वतःला कुरिअर कंपनी, डिलिव्हरी एजंट किंवा सर्व्हिस प्रतिनिधी म्हणून ओळख करून देतात. ते सांगतात की, तुमच्या नावावर पार्सल आले आहे, डिलिव्हरीमध्ये अडचण येत आहे किंवा एखादी माहिती अपडेट करायची आहे. विश्वास बसावा म्हणून ते SMS पाठवतात आणि समस्या सोडवण्यासाठी USSD कोड डायल करण्यास सांगतात.
USSD कोड म्हणजे धोका
हे USSD कोड बहुतेक वेळा 21, 61 किंवा 67 या आकड्यांनी सुरू होतात. जसेच युजर हा कोड डायल करतो, त्याच्या फोनमधील Call Forwarding सक्रिय होते. याचा अर्थ असा की, बँकेकडून येणारे OTP, व्हेरिफिकेशन कॉल आणि अलर्ट कॉल... हे सर्व थेट सायबर ठगांच्या फोनवर पोहोचू लागतात.
OTP गेल्यावर काय होते?
एकदा OTP आणि कॉल्स ठगांकडे गेले की, बँक खात्यातून पैसे काढणे, WhatsApp, Telegramसारखी अकाउंट्स हॅक करणे यांसारख्या गोष्टी होऊ शकतात. अनेक वेळा युजरला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते, तोपर्यंत खात्यातील पैसे गायब झालेले असतात.
I4C चा इशारा: लिंक नाही, अॅप नाही… तरीही धोका
या स्कॅमची सर्वात धोकादायक बाब म्हणजे, कोणत्याही लिंकवर क्लिक करावी लागत नाही, कोणतेही अॅप डाउनलोड करावे लागत नाही. फक्त एक कोड डायल करणे पुरेसे असते. म्हणूनच I4C ने लोकांना USSD कोडबाबत विशेष सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
संशय असल्यास लगेच काय करावे?
जर कोणालाही शंका वाटत असेल की, त्यांच्या फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग चुकीने सुरू झाली आहे, तर तात्काळ खालील कोड डायल करावा:
##002#
हा कोड डायल केल्यास, सर्व प्रकारची Call Forwarding बंद होते. कॉल पुन्हा थेट युजर्सच्या फोनवर येऊ लागतात.
Web Summary : Cyber thugs now exploit call forwarding to steal OTPs, access bank accounts, and hack social media. The Home Ministry advises caution with USSD codes and suggests dialing ##002# to disable forwarding if suspected.
Web Summary : साइबर ठग कॉल फ़ॉरवर्डिंग का उपयोग करके OTP चुरा रहे हैं, बैंक खातों तक पहुँच रहे हैं और सोशल मीडिया को हैक कर रहे हैं। गृह मंत्रालय ने USSD कोड के साथ सावधानी बरतने की सलाह दी है और संदेह होने पर फ़ॉरवर्डिंग को निष्क्रिय करने के लिए ##002# डायल करने का सुझाव दिया है।