शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

ईडीच्या टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय कठोर, ममता सरकारकडून मागितले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 22:02 IST

या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथे छापेमारी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयानेपश्चिम बंगाल राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने मंगळवारी (९ जानेवारी) ही माहिती दिली. या हल्ल्याप्रकरणी काय कारवाई करण्यात आली, याची माहिती राज्य सरकारने लवकरात लवकर द्यावी, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. राज्य सरकारच्या काही मंत्र्यांनी ५ जानेवारीची घटना जनक्षोभातून घडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.पश्चिम बंगालचे कृषी मंत्री शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी मंगळवारी दावा केला की तपास यंत्रणा छापे टाकणाऱ्या देशाच्या इतर भागातही असे हल्ले होतील. 

एका कार्यक्रमात शोभनदेब चट्टोपाध्याय म्हणाले, "राज्यात एका ठिकाणी जनक्षोभाचा स्फोट आम्ही पाहिला... भविष्यात भारतात इतर ठिकाणीही अशा घटना घडतील." मंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपा खासदार दिलीप घोष म्हणाले की, जनता पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला वाचवायचे असेल तर सत्तेतून ताबडतोब हकालपट्टी करावी.

ईडी अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकरणगेल्या 5 जानेवारीला ईडीचे पथक राज्याच्या रेशन व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या संदर्भात संदेशखळी येथील तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी आले होते, तेव्हा शेख यांच्या शेकडो समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर, ईडीने सांगितले होते की, आमच्या तपासादरम्यान अनेक लोकांनी ईडी टीम आणि सीआरपीएफ जवानांवर एका कंपाउंडमध्ये त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. हे लोक काठ्या, दगड, विटा अशा शस्त्रांस्त्रे घेऊन तयार होते. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय