शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान जयंतीला कायदा आणि सुव्यवस्था राखा, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 08:29 IST

गृह मंत्रालयाने आता हनुमान जयंती संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.

नवी दिल्ली : रामनवमीच्या मुहूर्तावर देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला होता. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. गृह मंत्रालयाने आता हनुमान जयंती संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत सर्व राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सांगण्यात आले आहे.

हनुमान जयंतीच्या तयारीबाबत मंत्रालयाने सर्व राज्यांना एक अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे. याशिवाय, सण शांततेत पाळण्यास आणि समाजातील जातीय सलोखा बिघडविणाऱ्यांवर नजर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर कोलकाता उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. हनुमान जयंतीनिमित्त राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत, अशी विचारणा न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला केली. यासोबतच हनुमान जयंतीनिमित्त शांतता राखण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी केंद्रीय दलाची मागणी करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

उच्च न्यायालयाने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्यारामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचाराबद्दल मंगळवारी उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून अहवाल मागवला होता. उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती टीएस. शिवज्ञानम आणि हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला या संदर्भात पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आणि रिसडा येथील हिंसाचाराच्या कारणांची माहिती मागवली होती.

गृह मंत्रालयाने बंगालमध्ये पाठवले निमलष्करी दल कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्वरीत कार्य करत, केंद्रीय गृह मंत्रालयाने हनुमान जयंती दरम्यान पश्चिम बंगालमधील राज्य पोलिसांना मदत करण्यासाठी निमलष्करी दल तैनात केले आहे. गृहमंत्र्यांच्या प्रवक्त्याने बुधवारी संध्याकाळी उशिरा ट्विट केले, "हनुमान जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिसांना मदत करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत." 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयHanuman Jayantiहनुमान जयंती