शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

नड्डांच्या ताफ्यावर हल्ला, केंद्र सरकार अ‍ॅक्टिव्ह, गृहमंत्रालयाने राज्यपालांकडे मागितला रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 20:40 IST

home ministry : कोलकाताजवळील दक्षिण २४ परगण्यात जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे नेते डायमंड हार्बरला जात असताना दुपारी बाराच्या वाजेच्या सुमारास त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यातच भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर आज दुपारी कोलकाता दौर्‍यात दगडांनी हल्ला करण्यात आला. यावरून भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर आरोप केला आहे. तसेच, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. याप्रकरणी गृहमंत्रालयाने राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे पश्चिम बंगालची सद्यस्थिती व कायदा व सुव्यवस्थेविषयी सविस्तर अहवाल मागविला आहे.

कोलकाताजवळील दक्षिण २४ परगण्यात जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे नेते डायमंड हार्बरला जात असताना दुपारी बाराच्या वाजेच्या सुमारास त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यास थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. यावेळी टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली, असे ते म्हणाले. दरम्यान, घटनेनंतर केंद्राने हे कठोर पाऊल उचलले आहे. याप्रकरणी राज्यपालांसमवेत डीजीपी आणि मुख्य सचिवांकडूनही अहवाल मागविण्यात आला आहे, असे सुत्रांकडून समजते. 

दुसरीकडे, जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'या पुरस्कृत हिंसाचारावर बंगाल सरकारला जनतेला उत्तर द्यावं लागेल. आज बंगालमध्ये भाजपा अध्यक्ष जेपी नड्डांवर झालेला हल्ला हा अत्यंत निषेधार्ह आहे. याचा कितीही निषेध केला तरी तो कमीच आहे. केंद्र सरकार हा हल्ला अत्यंत गांभीर्याने घेत आहे. या पुरस्कृत हिंसेसाठी बंगाल सरकारला राज्यातील शांतताप्रिय जनतेला उत्तर द्यावे लागेल, असे सांगत अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे.

'सभेसाठी पोहोचलो ते दुर्गामातेच्या कृपेमुळे'मी आज इथे सभेसाठी पोहोचलो ते दुर्गामातेच्या कृपेमुळे, असे जेपी नड्डा म्हणाले. तसेच, माध्यमांच्या वाहनांवरही दगडफेकही करण्यात आली. या हल्ल्यात कैलास विजयवर्गीय आणि मुकुल रॉयही जखमी झाले आहेत.ही घटना लोकशाहीला लाजवणारी आहे. या हल्ल्यातून ताफ्यातील एकही कार वाचू शकली नाही. बुलेट प्रूफ गाडी असल्याने आपण सुखरुप बचावलो, असे जेपी नड्डा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाj. p. naddaजे. पी. नड्डाwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा