शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या जीवाला मोठा धोका; गृह मंत्रालयानं दिला रोड शो टाळण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 17:16 IST

एसपीजीच्या परवानगीशिवाय मंत्री, अधिकाऱ्यांना मोदींना भेटता येणार नाही

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला मोठा धोका असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रालयाकडून सर्व राज्यांना अलर्ट पाठवण्यात आला आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजीच्या परवानगीशिवाय कोणत्याही मंत्र्याला आणि अधिकाऱ्याला मोदींची भेट घेता येणार नाही, असं या अलर्टमध्ये गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे रोड शो कमी करावेत, असा सल्ला सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधीदेखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मोदींचे झंझावाती दौरे सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींना चोख सुरक्षा पुरवण्याचं आव्हान सुरक्षा दलांसमोर असेल. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदीच भाजपाचा चेहरा असणार आहेत. त्यामुळे लवकरच त्यांच्या प्रचार दौऱ्यांना सुरुवात  होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांमधील डीजीपींना पत्र पाठवण्यात आले आहे. मोदींना अज्ञात व्यक्तीकडून धोका असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे मोदींची भेट घेण्यासाठी कोणत्याही मंत्र्याला आणि अधिकाऱ्याला त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या यंत्रणेची परवानगी आवश्यक असेल. याशिवाय मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले एसपीजीचे जवान मंत्र्यांची झडतीदेखील घेऊ शकतात. मोदी अनेकदा कार्यक्रमानंतर, रोड शो दरम्यान सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटतात. मोदींनी सर्वसामान्यांना अशाप्रकारे भेटणं टाळावं, असा सल्ला सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाHome Ministryगृह मंत्रालय