गृह राज्यमंत्री राम शिंदे रविवारी नांदेडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:06+5:302015-06-12T17:38:06+5:30
नांदेड : राज्याचे गृह (ग्रामीण), सार्वजनिक आरोग्य, कृषी व फलोत्पादन, पणन व पर्यटन राज्यमंत्री प्रा़राम शिंदे हे रविवार १४ जून रोजी नांदेड दौर्यावर येत असून त्यांचे रविवारी औरंगाबाद येथून मोटारीने सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन होणार आहे़

गृह राज्यमंत्री राम शिंदे रविवारी नांदेडात
न ंदेड : राज्याचे गृह (ग्रामीण), सार्वजनिक आरोग्य, कृषी व फलोत्पादन, पणन व पर्यटन राज्यमंत्री प्रा़राम शिंदे हे रविवार १४ जून रोजी नांदेड दौर्यावर येत असून त्यांचे रविवारी औरंगाबाद येथून मोटारीने सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन होणार आहे़ शासकीय विश्रामगृह येथून सकाळी ११़३० वाजता शासकीय मोटारीने पोलिस महानिरीक्षक नांदेड यांचे कार्यालयाकडे प्रयाण, ११़४५ वाजता पोलिस महानिरीक्षक नांदेड यांचे कार्यालय येथे आगमन व पोलिस महानिरीक्षक नांदेड तसेच नांदेड परिक्षेत्रातील पोलिस अधिक्षक यांचे समवेत कायदा, सुव्यवस्था व गुन्हे याबाबत आढावा बैठक़ दुपारी १ वाजता शासकीय मोटारीने मातोश्री चौक कवठा, नांदेडकडे प्रयाण़ १़१५ वाजता मातोश्री चौक कवठा येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती़ २़३० वाजता विश्रामगृहाकडे प्रयाण़ शासकीय विश्रामगृह येथून ४ वाजता औरंगाबादकडे प्रयाण करतील़