गृहमंत्री आज नेपाळला जाणार

By Admin | Updated: September 18, 2014 02:14 IST2014-09-18T02:14:03+5:302014-09-18T02:14:03+5:30

सार्क (साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन) गृहमंत्र्यांच्या सहाव्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गृहमंत्री राजनाथसिंग गुरुवारी काठमांडूला रवाना होणार आहेत.

Home Minister to go to Nepal today | गृहमंत्री आज नेपाळला जाणार

गृहमंत्री आज नेपाळला जाणार

नवी दिल्ली : सार्क (साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन) गृहमंत्र्यांच्या सहाव्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गृहमंत्री राजनाथसिंग गुरुवारी काठमांडूला रवाना होणार आहेत. नेपाळमध्ये शुक्रवारी ही बैठक होत आहे. या बैठकीत गृहमंत्री सीमापार दहशतवाद आणि काही सार्क देशांतील दहशतवादाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासारखे मुद्दे उपस्थित करण्याची अपेक्षा आहे. मंत्रिस्तरीय तद्वतच अधिका:यांच्या बैठकीत दहशतवादाच्या उच्चटनासह सागरी सुरक्षा, पायरसी, अमली पदार्थ तस्करी, भ्रष्टाचार निमरूलन व सायबर गुन्हे या मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Home Minister to go to Nepal today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.