शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

"काँग्रेसने त्यांना वेळ दिला नाही, भाजपच्या वेळेतील अर्धा तास द्या", अमित शाहांचा अधीर रंजन यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 22:18 IST

विरोधी पक्षांचा मोदींवर विश्वास नसेल, पण देशातील जनता मोदींसोबत आहे, असे अमित शाह म्हणाले.

नवी दिल्ली :  लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Lok Sabha) यांनी बुधवारी विरोधकांच्या अविश्वास ठरावाविरोधात भाषण केले. यावेळी अमित शाह यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच, भाषणादरम्यान सतत अडवणूक करणारे काँग्रेस नेते अधीर रंजन यांनाही अमित शाह यांनी सोडले नाही. दरम्यान, अमित शाह काश्मीर मुद्द्यावर बोलत असताना अधीर रंजन यांनी जोरदार भाषणबाजी सुरू केली. यावर अमित शाह म्हणाले की, "काँग्रेसने अधीरजींना वेळ दिला नाही, त्यांना भाजपच्या वेळेतील अर्धा तास द्या. त्यांच्या पक्षाने त्यांना वेळ दिला नाही म्हणून ते मध्येच बोलतात. आमचे संसदीय कामकाज मंत्रीही माझ्या या विनंतीला विरोध करणार नाहीत."

विरोधी पक्षांचा मोदींवर विश्वास नसेल, पण देशातील जनता मोदींसोबत आहे, असे अमित शाह म्हणाले. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात विरोधी पक्षांचे नेते म्हणाले होते की, ही मोदींची लस आहे, घेऊ नका; पण जनतेने पीएम मोदींवर विश्वास दाखवला आणि सर्व डोस पूर्ण केले. विरोधकांनीही लॉकडाऊनला विरोध करत गरीब काय खाणार असा सवाल केला होता. सरकारने लॉकडाऊन लागू केला तेव्हा एकही गरीब उपाशी राहिला नाही. ८० कोटी लोकांना मोफत गहू दिला, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, अमित शाह यांनी लोकसभेत मणिपूर हिंसाचाराची संपूर्ण माहिती दिली. यावेळी अमित शहा यांनी विरोधकांना घेरले आणि म्हटले की, मणिपूरमध्ये घडलेली घटना लज्जास्पद आहे, मात्र त्यावर राजकारण करणे त्याहूनही लज्जास्पद आहे. तसेच, देशात गैरसमज पसरवला गेला आहे की या सरकारला मणिपूरवर चर्चा करायची नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून चर्चा करण्यास तयार होतो. तुम्ही चर्चा करायलाही तयार नव्हते. गदारोळ करून तुम्ही आम्हाला गप्प कराल असे तुम्हाला वाटते. आपण ते करू शकत नाही. या देशातील १३० कोटी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवलं नाही? ४ मेच्या व्हिडिओवर अमित शाह म्हणाले की, तो व्हिडिओ संसदेच्या अधिवेशनाच्या एक दिवस आधी का आला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर का टाकण्यात आला. तो पोलिसांना का दिला नाही?  मी मणिपूरच्या जनतेला आवाहन करतो की हिंसा हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. याचबरोबर, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना न हटवल्याबद्दल अमित शहा म्हणाले की, राज्य सरकार सहकार्य करत नाही तेव्हा कलम ३५६ लागू केले जाते. आम्ही डीजीपीला हटवले. त्यांनी केंद्राचा निर्णय मान्य केला. मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांना काढून टाकले जाते, पण मणिपूरचे मुख्यमंत्री सहकार्य करत आहेत, असे अमित शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाParliamentसंसदManipur Violenceमणिपूर हिंसाचार