शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ला हॉलिवूडमधून पाठिंबा! 'या' अभिनेत्याने ट्विटद्वारे केले कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 23:20 IST

Congress Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचे जॉन क्यूसैकने कौतुक केले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या पंधरवड्यापासून अनेक ठिकाणी फिरली आहे. सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवरही भारत जोडो यात्रेची चर्चा जोरात सुरू आहे. या भारत जोडो यात्रेला अनेकांनी पाठिंबा दर्शवण्यास सुरुवात केली आहे. यात सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉन क्यूसैकचाही समावेश आहे. जॉन क्यूसैकने काँग्रेसच्या या यात्रेचे कौतुक केले आहे. 

भारत जोडो यात्रेतील राहुल गांधींच्या प्रयत्नांचे कौतुक करताना जॉन क्यूसैकने ट्विटरवर लिहिले की, "भारतीय खासदार राहुल गांधी काश्मीर ते केरळ प्रवास करत आहेत." त्यावर एका यूजरने त्याला धन्यवाद असा रिप्लाय दिला आहे. त्याच यूजरला अभिनेत्याने पुन्हा रिप्लाय दिला आहे की, "होय – एकता – सर्वत्र सर्व फॅसिस्टांविरुद्ध." दरम्यान, या ट्विटमुळे जॉन क्यूसैकला टीकेचाही सामना करावा लागला आहे. जॉन क्यूसैकची ही पडझड असल्याचे अनेकजण सांगत आहेत. 

जॉन क्यूसैकने 2012 आणि 'से एनीथिंग' सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करून लोकप्रियता मिळवली आहे. याआधीही हॉलिवूड अभिनेत्याने भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) विरोध आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचे त्यांनी कौतुक केले आहे.

काय आहे 'भारत जोडो यात्रा'?देशात लोकसभा निवडणूक 2024 साली होणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने जोमात तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रे'चे आयोजन केले आहे. कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबरला या पदयात्रेचा आरंभ झाला. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी तेथील नागरिकांना भेटत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसची भारत जोडी यात्रा 150 दिवसांत 3,570 किमी अंतर पार करणार आहेत. या यात्रेची सांगता  जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसHollywoodहॉलिवूड