छत्रपती सेवा मंडळातर्फे नारळाची होळी
By Admin | Updated: March 23, 2016 00:11 IST2016-03-23T00:11:47+5:302016-03-23T00:11:47+5:30
जळगाव : शाहुनगरातील छत्रपती सेवा मंडळातर्फे नारळाची (टाकाऊ शहाळे) होळी महंत बालकदास महाराज व माजी नगरसेवक दिपक सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत साजरी होणार आहे.

छत्रपती सेवा मंडळातर्फे नारळाची होळी
ज गाव : शाहुनगरातील छत्रपती सेवा मंडळातर्फे नारळाची (टाकाऊ शहाळे) होळी महंत बालकदास महाराज व माजी नगरसेवक दिपक सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत साजरी होणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते रस्त्यावर पाणी पिऊन खाली पडलेले नारळ जमा करुन ते जाळून होळी करणार आहेेत. यामुळे होळीसाठी होणारी वृक्षतोड होणार नाही. व पर्यावरणाचेही रक्षण होणार असून स्वच्छ भारत अभियानास हातभार लागेल. साजरा होणार्या या नारळाच्या होळी प्रसंगी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन मंडळाचे हितेंद्र टेकावडे, निलेश पाटील, किशोर देशमुख, दर्शन जाधव, संजय मालुसरे, प्रविण बोरकर, मोतीलाल पाटील यांनी केले आहे.