संपूर्ण देशात सध्या होळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र, आनंदाच्या या उत्सवात अनेकदा काही लोक इतरांना, विशेषतः महिलांना जबरदस्तीने रंग लावतात किंवा त्यांचा छळ करतात. कायदा कोणालाही तुमच्या इच्छेविरुद्ध रंग लावण्याचा अधिकार देत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील दीपक ठुकराल यांनी स्पष्ट केले आहे की, होळीच्या नावाखाली होणाऱ्या गैरवर्तनावर आता भारतीय न्याय संहिता अंतर्गत कठोर कारवाई केली जाऊ शकते.
१) विनयभंग केल्यास ५ वर्षांपर्यंत कैद (बीएनएस कलम ७४)
आयपीसी कलम ३५४ च्या जागी आता बीएनएस कलम ७४ लागू होते. जर एखाद्या पुरुषाने महिलेच्या इच्छेविरुद्ध तिला स्पर्श केला, जबरदस्तीने रंग लावला, मिठी मारणे किंवा तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केला, तर हा गंभीर गुन्हा मानला जातो. याप्रकरणात दोषी आढळल्यासा आरोपीला १ ते ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
२) लैंगिक छळ आणि अश्लील वर्तन (बीएनएस कलम ७५)
महिलेच्या संमतीशिवाय तिला स्पर्श करणे, अश्लील हावभाव करणे किंवा तिला अस्वस्थ वाटेल असे वर्तन करणे, गुन्हा मानला आहे. बीएनएस कलम ७५ अंतर्गत, होळीत गर्दीचा फायदा घेऊन महिलेला स्पर्श करण्याचा किंवा तिला अस्वस्थ वाटेल असे वर्तन करण्याचा प्रयत्न केल्यास आरोपीला ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकते.
३) अश्लील शेरेबाजी (बीएनएस कलम ७९)
केवळ शारीरिक स्पर्शच नाही, तर शब्दांनी किंवा अश्लील इशारा करणे, गुन्हा आहे. होळीच्या नावाखाली अश्लील टिप्पण्या करणे, टोमणे मारणे किंवा महिलेची प्रतिष्ठा दुखावणारे शब्द वापरल्यास या कलमांतर्गत कारवाई होते. याप्रकरणातील दोषींवर ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची कारवाई होऊ शकते.
Web Summary : Celebrate Holi responsibly! New laws impose strict penalties, including jail time, for offenses like harassment, sexual misconduct, and obscene remarks against women. Be aware of the consequences.
Web Summary : होली सावधानी से मनाएं! महिलाओं के खिलाफ उत्पीड़न, यौन दुराचार और अश्लील टिप्पणियों जैसे अपराधों पर नए कानूनों के तहत जेल सहित सख्त सजा का प्रावधान है। परिणामों के बारे में जागरूक रहें।