शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराने केली हिजबुलच्या 'टायगर'ची शिकार, दहशतवाद्यांविरोधात लष्कराला मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:36 IST

काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून चालविण्यात येत असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेला सोमवारी मोठे यश मिळाले असून, सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगर याला कंठस्नान घातले आहे.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून चालविण्यात येत असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेला सोमवारी मोठे यश मिळाले असून, सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगर याला कंठस्नान घातले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे समीर टायगर हा खोऱ्यामध्ये बुऱ्हाण वाणीप्रमाणेच दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय मानला जात होता. द्राबगाम येथे सोमवारी सकाळपासूनच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. या चकमकीमध्येच लष्कराने समीर टायगरला कंठस्नान घातले. समीरबरोबरच अकीब खान नामक अन्य दहशतवाद्यालाही लष्कराने ठार केले. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी आल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराने शोधमोहीम राबवून ही कारवाई केली. लष्कराने परिसराला घेराव घातल्यावर काही स्थानिकांकडून लष्करावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाले.  

 

सुरुवातीला करायचा दगडफेक मग बनला दहशतवादी दहशतवादी समीर अहमद भट ऊर्फ समीर टायगर याला 24 मार्च 2016  रोजी दगडफेकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची मुक्तताही करण्यात आली. पण तुरुंगातून बाहेर पडल्यावर तो कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनच्या जाळ्यात अडकला. 7 मे रोजी तो हिज्बुल मुजाहिद्दीनशी जोडला गेला. नंतर तो काश्मीर खोऱ्यामध्ये बराच प्रसिद्ध झाला होता.  विशेषत: गेल्या काही महिन्यात तो काश्मिरी दहशतवादाचा नवा पोस्टर बॉय बनला होता.   

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर