शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दहशतवाद्यांचं सुरक्षा दलांना खुलं आव्हान; श्रीनगरच्या लालचौकात काढला सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 10:51 PM

हिज्बुलच्या कमांडरचा श्रीनगरच्या लालचौकात सेल्फी

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना थेट आव्हान दिलं आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी थेट श्रीनगरच्या मध्यभागात असलेल्या लालचौक परिसरात बैठक घेतली आहे. या बैठकीला जवळपास १० दहशतवादी उपस्थित होते, असं वृत्त 'टाईम्स नाऊ'नं दिलं आहे. या बैठकीनंतर हिज्बुलचा कमांडर उमर माजिद उर्फ हनजल्लानं या भागातील सेल्फीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काश्मीरच्या प्रसिद्ध लालचौक परिसरात उमर माजिदनं काढलेला सेल्फी सध्या व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हिज्बुलनं या बैठकीआधी सुरक्षा दलांना थेट आव्हान दिलं होतं. '२१ तारखेला आम्ही श्रीनगरमध्ये बैठक घेऊ. सुरक्षा दलांनी त्यांना हवं ते करावं,' असा स्पष्ट इशारा हिज्बुल मुजाहिद्दीननं दिला होता. त्यानंतर आता उमरचा लालचौकातील सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सेल्फीत श्रीनगरमधलं प्रसिद्ध घंटाघर दिसत आहेत. हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांची श्रीनगरमध्ये बैठक झाली. उमर माजिद या बैठकीचा मास्टरमाईंड होता. बैठकीनंतर त्यानं घंटाघराजवळ एक सेल्फी काढला. त्यानंतर त्यानं तो सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र याबद्दल पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यानंतर त्याची माहिती दिली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा समोर आला आहे.  

टॅग्स :Hizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानSelfieसेल्फी