नवी दिल्ली - दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेला जर्मन हुकूमशाह हिटलरची आठवण काढली तरी आपल्या नजरेसमोर दुसऱ्या महायुद्धातील संहार आणि त्याने ज्यू नागरिकांवर केलेले अनन्वित अत्याचार येतात. पण आज चक्क हिटलर भारतीयसंसदेच्या आवारात अवतरला आणि सर्वांनाच धक्का बसला. पण हा कुणी खराखुरा हिटलर नव्हता तर चित्रविचित्र वेशभूषा करून संसदेत येण्यासाठी प्रसिद्ध असलेले तेलुगू देसमचे खासदार एन. शिवकुमार हे हिटलरचा वेश धारण करून संसदेत आले. तेलुगू देसम पक्ष आंध्र प्रदेशसाठी विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करत आहे. या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवकुमार हे असा वेश धारण करून संसदेत आले.
संसदेत आला हिटलर! पाहून सर्वांनाच बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 12:42 IST