हिट अँड रन : भरधाव कारने रिक्षाला नेले १०० मीटरपर्यंत फरपटत

By Admin | Updated: June 15, 2016 14:09 IST2016-06-15T14:09:09+5:302016-06-15T14:09:25+5:30

एका भरधाव कारने रिक्षाला जोरदार ठोकर दिल्याने रिक्षा १०० मीटरपर्यंत फरपटत जाऊन दोन तरूणी जखमी झाल्याची घटना नोएडामध्ये घडली

Hit and Run: Walking through 100 miles to the rickshaw | हिट अँड रन : भरधाव कारने रिक्षाला नेले १०० मीटरपर्यंत फरपटत

हिट अँड रन : भरधाव कारने रिक्षाला नेले १०० मीटरपर्यंत फरपटत

>ऑनलाइन लोकमत
नोएडा, दि. १५ - एका भरधाव कारने रिक्षाला जोरदार ठोकर दिल्याने रिक्षा १०० मीटरपर्यंत फरपटत जाऊन दोन तरूणी जखमी झाल्याची घटना नोएडामध्ये घडली. विशेष म्हणजे या अपघाताला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नाही वा कोणाला अटकही केली नाही. ७ जून रोजी हा अपघात झाला असून त्यामध्ये स्निग्धा बिश्त (२५) व मालविका बिश्त (२३) या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
स्निग्धा ही एक फॅशन डिझायनर असून मालविका एका हॉटेलमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतात. ७ जून रोजी त्या दोघी मॉलमध्ये चित्रपट पाहून ९.३०च्या सुमारास रिक्षातून घरी जात असतानाच सेक्टर ३६ जवळ त्यांच्या रिक्षाला एका भरधाव वेगाने आलेल्या मारती वॅगनने त्यांना जोरदार धडक दिली. एवढेच नव्हे तर कारच्या धडकेमुळे रिक्षा १०० मीटर अंतरापर्यंत फरपटत गेली व त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या. 
अपघातानंतर कारचलाकाने तेथून तत्काळ पळ काढला. स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघींना रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Hit and Run: Walking through 100 miles to the rickshaw