पूर्वजांच्या वारशाचे राजकारण संपणार
By Admin | Updated: August 30, 2015 22:09 IST2015-08-30T22:09:19+5:302015-08-30T22:09:19+5:30
पूर्वजांची पुण्याई, घराणेशाहीचा वारसा, वंशपरंपरेने चालत आलेले राजकारण लवकरच संपेल. भविष्यात अशा घराणेशाहीला भारतीय राजकारणात कुठलेही

पूर्वजांच्या वारशाचे राजकारण संपणार
नवी दिल्ली : पूर्वजांची पुण्याई, घराणेशाहीचा वारसा, वंशपरंपरेने चालत आलेले राजकारण लवकरच संपेल. भविष्यात अशा घराणेशाहीला भारतीय राजकारणात कुठलेही स्थान असणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली रविवारी म्हणाले. उद्योगधंद्यात हा बदल आधीच आला आहे, आता राजकारणाची पाळी आहे, असेही ते म्हणाले. त्यांचा इशारा काँग्रेस आणि अशाच अन्य घराणेशाहीतून रुजलेल्या प्रादेशिक पक्षांकडे होता.
येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या तिसऱ्या दीक्षांत समारोहप्रसंगी केलेल्या भाषणात ते बोलत होते. १९९१ हे वर्ष भारतीय इतिहासाला निर्णायक वळण देणारे ठरले. या वर्षात अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणानंतर जग आधीपेक्षा ‘किती तरी अधिक क्रूर’ झाले आहे आणि या जगात जो उत्कृष्ट असेल तोच टिकणार आहे. केवळ उद्योगजगतातच नाही तर यापुढे राजकारणातही हेच होणार आहे.