History of Air Crashes in India : हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचे निधन; यापूर्वीही 'या' दिग्गजांचा हवाईप्रवास ठरला अखेरचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 08:02 PM2021-12-08T20:02:58+5:302021-12-08T20:03:46+5:30

History of Air Crashes in India : विमान अपघातात एखादे मोठे व्यक्तिमत्त्व गमवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे विमान अपघातात निधन झाले आहे.

History of Air Crashes in India : Sanjay Gandhi, Madhavrao Scindia, YSR — some prominent Indians who died in air crashes | History of Air Crashes in India : हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचे निधन; यापूर्वीही 'या' दिग्गजांचा हवाईप्रवास ठरला अखेरचा!

History of Air Crashes in India : हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचे निधन; यापूर्वीही 'या' दिग्गजांचा हवाईप्रवास ठरला अखेरचा!

googlenewsNext

History of Air Crashes in India: तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी (08 डिसेंबर) लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपिन रावत, त्यांच्या पत्नीसह या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. या अपघातात बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचे निधन झाले. या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

दरम्यान, विमान अपघातात एखादे मोठे व्यक्तिमत्त्व गमवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. विमान अपघातात कोणत्या बड्या राजकारण्यांना आपला जीव गमवावा लागला? त्याबद्दल जाणून घेऊया...

वायएस राजशेखर रेड्डी 
आंध्र प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वायएस राजशेखर रेड्डी यांचे 2009 मध्ये रुद्रकोंडा हिल येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. रेड्डी हे काँग्रेसमधील सर्वात प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक होते आणि त्यांनी 2009 मध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्यास मदत केली होती.

माधवराव शिंदे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे यांचा सप्टेंबर 2001 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. माधवराव शिंदे आणि इतर सहा जणांना घेऊन जाणारे खाजगी विमान उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्याच्या बाहेरील भागात कोसळले होते.

जीएमसी बालयोगी
जीएमसी बालयोगी, जे लोकसभेचे सभापती होते. 03 मार्च 2002 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकलूर येथे हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले. जीएमसी बालयोगी यांची 1998 मध्ये लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली होती. 1999 मध्ये ते पुन्हा 13 व्या लोकसभेचे सभापती बनले. ते लोकसभेचे पहिले दलित सभापती होते.

मोहन कुमारमंगलम
1973 मध्ये नवी दिल्लीजवळ इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपघातात काँग्रेस नेते मोहन कुमारमंगलम यांचा मृत्यू झाला. मोहन कुमारमंगलम हे आधी कम्युनिस्ट पार्टीमध्ये होते, पण नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

सी संगमा
सप्टेंबर 2004 मध्ये केंद्रीय मंत्री आणि मेघालयचे समुदाय विकास मंत्री सी संगमा यांचाही हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. संगमा पवन हंस नावाच्या हेलिकॉप्टरने गुवाहाटीहून शिलाँगला जात होते.

ओम प्रकाश जिंदल
31 मार्च 2005 रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात हरयाणाचे तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि प्रसिद्ध उद्योगपती ओम प्रकाश जिंदाल यांचा मृत्यू झाला होता. जिंदाल 1996 ते 1997 या काळात अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण समितीचे सदस्य होते.

डेरा नाटुंग
अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री डेरा नाटुंग यांचे 2001 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. राज्यात EMRS (एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल) मॉडेल सुरू करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.

सुरेंद्र नाथ 
विमान अपघातात पंजाबचे राज्यपाल सुरेंद्र नाथ आणि त्यांच्या कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला होता. खराब हवामानात सरकारी विमान 09 जुलै 1994 रोजी हिमाचल प्रदेशातील उंच पर्वतांवर कोसळले. त्यावेळी सुरेंद्र नाथ हिमाचलचे कार्यवाहक राज्यपाल होते.

संजय गांधी
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा लहान मुलगा संजय गांधी यांचा जून 1980 मध्ये दिल्लीत विमान अपघातात मृत्यू झाला होता.

Web Title: History of Air Crashes in India : Sanjay Gandhi, Madhavrao Scindia, YSR — some prominent Indians who died in air crashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.