शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेसाठी 'ऐतिहासिक दिन', सर्वोच्च न्यायाधीशपदी 'महिला तीन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 15:26 IST

देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज तीन नवीन न्यायाधीशांनी एकत्र प्रवेश केला आहे. न्या. केएम जोसेफ, न्या.विनीत शरण आणि न्या.इंदिरा बनर्जी आजपासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. त्यामुळे न्या. इंदिरा बॅनर्जी यांसह सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांची संख्या तीन झाली आहे.

नवी दिल्ली - देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज तीन नवीन न्यायाधीशांनी एकत्र प्रवेश केला आहे. न्या. केएम जोसेफ, न्या.विनीत शरण आणि न्या.इंदिरा बनर्जी आजपासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. न्या. इंदिरा बॅनर्जी यांसह सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांची संख्या तीन झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी तीन महिलांची नियुक्ती झाली आहे. न्या. आर भानुमति, न्या. इंदु मल्होत्रा आणि न्या. इंदिरा बनर्जी, अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे, आता सर्वोच्च न्यायालयात महिलाराज चालणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी न्या. के.एम.जोसेफ यांचे नावा गेल्या अनेक दिवसांपासून आघाडीवर होते. त्यानंतर, आता न्या. इंदिरा बॅनर्जी यांचेही नाव सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या यादीत आले आहे. गेल्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर इंदिरा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आज म्हणून शपथ घेतली. इंदिरा यांनी 5 जुलै 1985 साली आपल्या वकिलीची सनद घेतली. त्यानंतर, कोलकाता येथील सत्र न्यायालयात, उच्च न्यायालयात प्रॅक्टीस सुरू केली. क्रिमीनल लॉसोबतच इंदिरा यांनी इतरही प्रकरणात महत्त्वाचे खटले लढले आहेत. त्यानंतर, 5 फ्रेब्रुवारी 2002 साली त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीशपदी कार्यभार स्विकारला. तर, एप्रिल 2017 साली मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कार्यभार स्विकारला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती होणाऱ्या आठव्या महिला न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांचा कार्यकाळ 4 वर्षे आणि 1 महिना एवढा असणार आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRamnath Kovindरामनाथ कोविंदdelhiदिल्ली