शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Who is Saurabh Kirpal: ऐतिहासिक! सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक न्यायाधीश होण्याची शक्यता; सर्वोच्च न्यायालयाची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 9:22 AM

Who is Saurabh Kirpal: माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी निवृत्त होण्यापूर्वी केंद्र सरकारला सौरभ कृपाल यांच्या न्यायाधीशपदी नियुक्तीबाबत मत स्पष्ट करण्यास सांगितले होते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल (Saurabh Kirpal) यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे (Delhi high court) न्यायाधीश बनवण्याची शिफारस केली आहे. विशेष म्हणजे ते भारतातील पहिले समलैंगिक न्यायाधीश होऊ शकतात. नियुक्ती झाल्यास ते भारतातील पहिले समलैंगिक न्यायाधीश असतील.

या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) एक निवेदन जारी करण्यात आले आहे. कॉलेजियमची बैठक 11 नोव्हेंबरला झाली. ज्यामध्ये सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला सौरभ कृपाल यांच्या न्यायाधीशपदी नियुक्तीबाबत मत स्पष्ट करण्यास सांगितले होते. 

याआधी चारवेळा कृपाल यांच्या नावाची न्यायाधीश बनण्याबाबत चर्चा झाली होती. परंतू याबाबत मते विभागली गेली होती. सौरभ कृपाल यांच्या नावाची कॉलेजियमने पहिल्यांदा 2017 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी शिफारस केली होती. 

कोण आहेत सौरभ कृपाल...(Who is Saurabh Kirpal)सौरभ कृपाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर (कायदा) पदवी मिळविली. त्यांनी दोन दशके सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. त्याचबरोबर त्यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघासोबतही काम केले आहे. सौरभच यांना 'नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारतीय संघ' या खटल्यासाठी ओळखले जाते. कलम 377 हटवण्यासाठी याचिकाकर्त्याचे ते वकील होते. सप्टेंबर 2018 मध्ये कलम 377 बाबतचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय