Who is Saurabh Kirpal: ऐतिहासिक! सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक न्यायाधीश होण्याची शक्यता; सर्वोच्च न्यायालयाची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 09:22 AM2021-11-16T09:22:55+5:302021-11-16T09:37:57+5:30

Who is Saurabh Kirpal: माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी निवृत्त होण्यापूर्वी केंद्र सरकारला सौरभ कृपाल यांच्या न्यायाधीशपदी नियुक्तीबाबत मत स्पष्ट करण्यास सांगितले होते. 

Historic! Saurabh Kripal likely to be the country's first gay judge; Recommendation of the Supreme Court | Who is Saurabh Kirpal: ऐतिहासिक! सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक न्यायाधीश होण्याची शक्यता; सर्वोच्च न्यायालयाची शिफारस

Who is Saurabh Kirpal: ऐतिहासिक! सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक न्यायाधीश होण्याची शक्यता; सर्वोच्च न्यायालयाची शिफारस

Next

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल (Saurabh Kirpal) यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे (Delhi high court) न्यायाधीश बनवण्याची शिफारस केली आहे. विशेष म्हणजे ते भारतातील पहिले समलैंगिक न्यायाधीश होऊ शकतात. नियुक्ती झाल्यास ते भारतातील पहिले समलैंगिक न्यायाधीश असतील.

या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) एक निवेदन जारी करण्यात आले आहे. कॉलेजियमची बैठक 11 नोव्हेंबरला झाली. ज्यामध्ये सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला सौरभ कृपाल यांच्या न्यायाधीशपदी नियुक्तीबाबत मत स्पष्ट करण्यास सांगितले होते. 

याआधी चारवेळा कृपाल यांच्या नावाची न्यायाधीश बनण्याबाबत चर्चा झाली होती. परंतू याबाबत मते विभागली गेली होती. सौरभ कृपाल यांच्या नावाची कॉलेजियमने पहिल्यांदा 2017 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी शिफारस केली होती. 

कोण आहेत सौरभ कृपाल...(Who is Saurabh Kirpal)
सौरभ कृपाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर (कायदा) पदवी मिळविली. त्यांनी दोन दशके सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. त्याचबरोबर त्यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघासोबतही काम केले आहे. सौरभच यांना 'नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारतीय संघ' या खटल्यासाठी ओळखले जाते. कलम 377 हटवण्यासाठी याचिकाकर्त्याचे ते वकील होते. सप्टेंबर 2018 मध्ये कलम 377 बाबतचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.

Read in English

Web Title: Historic! Saurabh Kripal likely to be the country's first gay judge; Recommendation of the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.