शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:32 IST

one day Leave for Women: महिलांच्या आरोग्य आणि कार्यस्थळी सन्मानाला महत्त्व देत, कर्नाटक सरकारने एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

कर्नाटक सरकारने १८ ते ५२ वयोगटातील सर्व (सरकारी-खासगी) महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीची पगारी रजा अनिवार्य करणारा आदेश जारी केला. वर्षाला १२ सुट्ट्या आणि वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही, असा देशात नियम लागू करणारे कर्नाटक पहिले राज्य ठरले आहे.

महिलांच्या आरोग्य आणि कार्यस्थळी सन्मानाला महत्त्व देत, कर्नाटक सरकारने एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १८ ते ५२ वयोगटातील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी आता मासिक पाळीच्या काळात दरमहा एक दिवसाची भरपगारी सुट्टी अनिवार्य करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारच्या कामगार विभागाने १२ नोव्हेंबर २०२५ रोजी या संदर्भात अधिकृत आदेश (Government Order No. 466) जारी केला असून, या निर्णयामुळे आता राज्यातील सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांतील लाखो महिला कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू झाला आहे. 

IT, कारखाने, MNCs साठी नियम बंधनकारकहा आदेश केवळ सरकारी कार्यालयांपुरता मर्यादित नसून, कारखाने, आयटी कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, वृक्षारोपण उद्योग आणि दुकाने व व्यावसायिक आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणीकृत असलेल्या सर्व आस्थापनांना लागू असेल.

सुट्टीच्या धोरणाचे महत्त्वाचे मुद्देमहिला कर्मचाऱ्यांना वर्षभरात एकूण १२ दिवसांची (दरमहा एक दिवस) पगारी रजा घेण्याचा हक्क असणार आहे. यासाठी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज राहणार नाही. महिला फक्त तोंडी सूचना देऊन ही रजा घेऊ शकतात. दर महिन्याला मिळालेली ही सुट्टी त्याच महिन्यात वापरावी लागणार आहे. ती कॅरी फॉरवर्ड होणार नाही. जो नियोक्ता किंवा संस्था या आदेशाचे उल्लंघन करेल, त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Historic! Paid menstrual leave for women in Karnataka's workplaces.

Web Summary : Karnataka mandates paid menstrual leave for women (18-52) in all sectors. One day monthly leave, no medical certificate needed. Violators face action.
टॅग्स :Karnatakकर्नाटकWomenमहिलाwomens healthस्त्रियांचे आरोग्य