इतिहासकार बिपीन चंद्रा यांचे निधन

By Admin | Updated: August 30, 2014 11:48 IST2014-08-30T11:45:40+5:302014-08-30T11:48:31+5:30

प्रसिद्ध इतिहासकार बिपीन चंद्रा यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

Historian Bipin Chandra passed away | इतिहासकार बिपीन चंद्रा यांचे निधन

इतिहासकार बिपीन चंद्रा यांचे निधन

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० - प्रसिद्ध इतिहासकार बिपीन चंद्रा यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.  

त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या चंद्रा यांचे गुडगाव येथील निवासस्थानी सकाळी सहाच्या सुमारास निधन झाले. झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

चंद्रा हे आधुनिक भारताच्या आर्थिक व राजनैतिक इतिहासातील तज्ञ होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे खास योगदान होते. त्यांनी 'आधुनिक भारताचा इतिहास', 'भारताचा स्वातंत्र्य संघर्ष', अशी अनेक प्रसिद्ध पुस्तके लिहीली आहेत.

 

Web Title: Historian Bipin Chandra passed away