शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांचे मानसिक संतुलन ढासळलंय', हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी अरविंद केजरीवालांवर का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:29 IST

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अरविंद केजरीवालांनी हरयाणाला ओढल्याने मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी पलटवार केला. केजरीवालांचा दावा सैनी यांनी फेटाळून लावला. 

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून, राजकीय वार-प्रतिवाराच्या फैऱ्या झडत आहेत. दिल्लीच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरयाणाला ओढल्याने हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी भडकले. अरविंद केजरीवालांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे, असे म्हणत त्यांनी पलटवार केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आता यमुनेच्या दूषित पाण्याचाही मुद्दाही ऐरणीवर आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या विषारी पाण्यासाठी हरयाणा जबाबदार असल्याचा आरोप केला. हरयाणामधून यमुना पात्रात विषारी पाणी सोडले जात असल्याचा दावा केजरीवालांनी केला.

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर 

अरविंद केजरीवालांच्या विधानाला हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी उत्तर दिले. केजरीवालांच्या विधानाचा निषेध करत मुख्यमंत्री सैनी म्हणाले, 'केजरीवालांनी सांगावं की, कोणते विष टाकले गेले. किती टन विष टाकले गेले?'

'नीच राजकारणात केजरीवालांची बरोबरी करू शकत नाही'

"दिल्ली हरयाणा सीमेवर पाणी कसे रोखले आहे? भिंत बांधली आहे. कुठे बनवली आहे? जर पाणी विषारी आहे, तर त्या पाण्यात किती मासे मरण पावले. नीच आणि खोटे राजकारण करण्यात केजरीवालांची कोणी बरोबरी करू शकत नाही", अशा शब्दात मुख्यमंत्री सैनी यांनी केजरीवालांवर हल्ला चढवला.    मुख्यमंत्री सैनी यांनी केजरीवालांवर हरयाणाचा अपमान केल्याचा आरोप केला. ते  म्हणाले, "केजरीवालांनी त्या मातीचा अपमान केला आहे, जिथे त्यांचा जन्म झाला आहे."

"हरयाणातील लोक यमुनेला पवित्र नदी मानतात आणि तिची पूजा करतात. हरयाणाचे लोक मग नदीत विषारी पाणी का मिसळवतील? अरविंद केजरीवाल यांनी २०२० मध्ये खोटं आश्वासन दिले होते की, जर यमुन नदीला दूषित होण्यापासून वाचवू शकलो नाही, तर परत मत मागणार नाही", अशी टीकाही मुख्यमंत्री सैनी यांनी केली. 

मुख्यमंत्री सैनी म्हणाले, "निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने केजरीवालांचे मानसिक संतुलन ढासळलं आहे. केजरीवालांनी लगेच हरयाणा आणि दिल्लीतील लोकांची माफी मागायला हवी. नाहीतर आम्ही मानहानीचा दावा दाखल करू", असा इशाराही सैनी यांनी दिला आहे. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकHaryanaहरयाणाBJPभाजपाAAPआप