श्रृंगी घुबड जखमी
By Admin | Updated: January 6, 2016 23:00 IST2016-01-06T23:00:39+5:302016-01-06T23:00:39+5:30
(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे) (फोटो आहे)

श्रृंगी घुबड जखमी
(ग ्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे) (फोटो आहे)जळगाव- ममुराबादनजीक नव्याने बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमध्ये श्रृंगी जातीचे घुबड जखमी अवस्थेमध्ये बुधवारी सकाळी वन्यजीव संस्थेच्या कार्यकर्त्यांना आढळले. या घुबडाच्या पंखांना मोठी इजा झाली आहे. त्याला उच्च दाबाच्या तारांचा शॉक लागल्याचा कयास संस्थेच्या कार्यकर्त्यांचा आहे. हे घुबड जखमी असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मोबाईलवर मिळाली होती. त्यानुसार मंदार वासुदेव वाढे हा लागलीच ममुराबाद येथे पोहोचला. त्याने जखमी घुबडाला शहरात आणले. पशुसंवर्धन उपायुक्तालयाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात त्यावर उपचार करण्यात आले. श्रृंगी घुबडांची संख्या कमी होत आहे. त्याचा वापर दृष्टिहीन व्यक्तींसाठीच्या औषधासाठी केला जात असल्याचे समजते. यामुळे या घुबडांची तस्करीही होते, असे सांगण्यात आले.