हिंगणा... व्याख्यान

By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:19+5:302015-01-23T01:05:19+5:30

फोटो...

Hingana ... lecture | हिंगणा... व्याख्यान

हिंगणा... व्याख्यान

टो...
हिंगणा येथे महिलांसाठी व्याख्यान
हिंगणा : स्थानिक श्रीसंत गमाजी महाराज इन्स्टट्यिूटच्यावतीने महिलांसाठी व्याख्यान पार पडले. भविष्यातील स्त्रियांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना या विषयावर आयोजित व्याख्यानात महिलांनी विचारमंथन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सदस्या अरुणा बंग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला बोढारे तर प्रमुख अतिथी म्हणून राजकुंवरदेवी बंग, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य संजीवनी निनावे, प्राचार्य रोशन बनकर, प्रा. माया आदमने यांची उपस्थिती होती.
किशोरवयीन मुली म्हणजे उद्याच्या संसारिक गृहिणी आहे. किशोर वयातून संसारात पदार्पण केल्यानंतर त्यांच्यासमोर येणाऱ्या विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी मुलींनी विद्यार्थीदशेत पूर्वतयारी म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन उज्ज्वला बोढारे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. प्रसंगी इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
संचालन निरंजनी धार्मिक यांनी तर आभार प्रा. क्षमा मोडक यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. विद्या कोठे, अर्चना घाडबांधे, कल्याणी कोसरे, पल्लवी कडू, पल्लवी निमकर, राखी तिलपाले आदींसह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Hingana ... lecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.