हिंदूंनो बंगालमध्ये गुजरात दंग्यांप्रमाणे प्रत्युत्तर द्या; भाजपा आमदार बरळला
By Admin | Updated: July 9, 2017 11:43 IST2017-07-09T11:43:20+5:302017-07-09T11:43:20+5:30
पश्चिम बंगालमध्ये उफाळलेला हिंसाचार आणि दंगली यांना हिंदूंनी 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलींप्रमाणे प्रत्युत्तर द्यावे, असे आक्षेपार्ह

हिंदूंनो बंगालमध्ये गुजरात दंग्यांप्रमाणे प्रत्युत्तर द्या; भाजपा आमदार बरळला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - पश्चिम बंगालमध्ये उफाळलेला हिंसाचार आणि दंगली यांना हिंदूंनी 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलींप्रमाणे प्रत्युत्तर द्यावे, असे आक्षेपार्ह वक्तव्य तेलंगणामधील भाजपा आमदार राजा सिंह यांनी केले आहे. आधीच बंगालमधील वातावरण बिघडलेले असताना राजा सिंह यांनी फेसबूकवरील आपल्या व्हीडिओमधून थेट चिथावणीच दिल्याने या वक्तव्यावरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे.
बंगालमधील पेटलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राजा सिंह यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये राजा सिंह म्हणाले, "बंगालमधील हिंदूंकडे सध्या दोनच रस्ते आहेत. एक म्हणजे काश्मीरप्रमाणे नपुंसक बनून तेथून पळ काढायचा किंवा संघटित होऊन 2002च्या गुजरात दंगलीची बंगालमध्ये पुनरावृत्ती करावी."
सध्याच्या परिस्थितीत बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नसल्याचा दावा राजा सिंह यांनी आपल्या व्हिडिओत केला आहे. तसेच पश्चिम बंगालमधील सरकार दंगेखोरांना सूट देत आहे असा आरोपही त्याने केला आहे. बंगालमधील हिंदू जागरुक झाले नाहीत तर काश्मीरमधील हिंदूंप्रमाणेच त्यांना पळवून लावले जाईल, असेही तो या व्हिडिओत म्हणतो.