हिंदूंनी शाहरुख, सलमान व आमीरचे चित्रपट बघू नये - साध्वी प्राची
By Admin | Updated: March 2, 2015 09:59 IST2015-03-02T09:48:47+5:302015-03-02T09:59:43+5:30
सलमान खान, आमीर खान व शाहरुख खान या तिघांचे चित्रपट हिंदूंनी बघू नये असे वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे.

हिंदूंनी शाहरुख, सलमान व आमीरचे चित्रपट बघू नये - साध्वी प्राची
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - सलमान खान, आमीर खान व शाहरुख खान या तिघांचे चित्रपट हिंदूंनी बघू नये असे वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील भारतीय मुलीशीच लग्न करायला हवे असे मत त्यांनी मांडले आहे.
उत्तराखंडमधील डेहराडून येथे एका कार्यक्रमात साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. सलमान, शाहरुख व आमीर या तिघांच्या चित्रपटांमधून लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळत असल्याने हिंदूंनी त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालायला हवी असे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. तर राहुल गांधी यांनी भारतीय मुलीशी लग्न करुन लवकरात लवकर सेटल व्हावे असा सल्लाही त्यांनी राहुल गांधी यांना दिला. खान त्रिकुटानंतर मदर तेरेसांवरही साध्वी प्राची यांनी टीका केली. मदर तेरेसा यांनी धर्मांतरविरोधी कायद्याला विरोध दर्शवला होता असा आरोप साध्वी प्राची यांनी केला.