हिंदुंना दोन मुलगे तर, मुस्लिमांनाही दोनच मुलगे पाहिजेत - गिरीराज सिंह

By Admin | Updated: April 21, 2016 16:09 IST2016-04-21T16:07:08+5:302016-04-21T16:09:35+5:30

भारताने सर्व धर्मांसाठी दोन मुलांचा नियम सक्तीचा केला नाही तर, भारतात हिंदु मुली सुरक्षित रहाणार नाहीत.

Hindus have two sons, Muslims should have two sons - Giriraj Singh | हिंदुंना दोन मुलगे तर, मुस्लिमांनाही दोनच मुलगे पाहिजेत - गिरीराज सिंह

हिंदुंना दोन मुलगे तर, मुस्लिमांनाही दोनच मुलगे पाहिजेत - गिरीराज सिंह

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. २१ - भारताने सर्व धर्मांसाठी दोन मुलांचा नियम सक्तीचा केला नाही तर, भारतात हिंदु मुली सुरक्षित रहाणार नाहीत. पाकिस्तानप्रमाणे मुलींना बुरख्यामध्ये ठेवावे लागेल असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. भारताने आपले लोकसंख्येचे धोरण बदलणे आवश्यक आहे असे गिरीराज सिंह यांनी सांगितले. 
 
पश्चिम चंपारणमध्ये बाघा येथे सांस्कृतिक यात्रेमध्ये ते बोलत होते.  या कार्यक्रमाला अनेक साधू आणि आरएसएसचे स्वयंसेवक प्रेक्षकांमध्ये बसले होते. हिंदुंना दोन मुलगे असतील तर, मुस्लिमांनाही दोन मुलगे असले पाहिजेत. आपली लोकसंख्या कमी होत आहे. बिहारमध्ये सात जिल्हे असे आहेत जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. 
 
लोकसंख्या नियंत्रणाचा नियम बदलला पाहिजे तेव्हाच हिंदू मुली सुरक्षित रहातील. नाहीतर, आपल्यालाही पाकिस्तानप्रमाणे आपल्या मुलींना बुरख्यामध्ये ठेवावे लागेल असे गिरीराज म्हणाले. किशनगंज, अरारीया या जिल्ह्यांचे त्यांनी आपल्या भाषणाता उदहारण दिले.  हिंदू पेक्षा इथे मुस्लिम लोकसंख्येचा टक्का वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. 
 

Web Title: Hindus have two sons, Muslims should have two sons - Giriraj Singh