ज्ञानवापी मशिदीनंतर आता जामा मशिदीच्या सर्व्हेची मागणी, विष्णूचं मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:55 PM2022-05-18T12:55:59+5:302022-05-18T13:00:06+5:30

ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे झाल्यानंतर आता हिंदू महासभा आणि युनायटेड हिंदू फ्रंट तसंच इतर काही हिंदू संघटनांनी दिल्लीस्थित जामा मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा केला आहे.

hindu organizations demanded a survey of delhi jama masjid said they will go to court with the demand of survey | ज्ञानवापी मशिदीनंतर आता जामा मशिदीच्या सर्व्हेची मागणी, विष्णूचं मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा

ज्ञानवापी मशिदीनंतर आता जामा मशिदीच्या सर्व्हेची मागणी, विष्णूचं मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा

googlenewsNext

ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे झाल्यानंतर आता हिंदू महासभा आणि युनायटेड हिंदू फ्रंट तसंच इतर काही हिंदू संघटनांनी दिल्लीस्थित जामा मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा केला आहे. हिंदू संघटनांनी जामा मशिदीवर हक्क सांगत आता ज्ञानवापी प्रमाणेच जामा मशिदीच्या सर्व्हेचीही मागणी केली आहे. हिंदू संघटनांनी यासाठी कोर्टात जाण्याचीही तयारी सुरू केली आहे. दिल्लीच्या जामा मशिदीखाली औरंगजेबानं शेकडो देवी-देवतांच्या मूर्ती गाडल्या आहेत, असा दावा अखिल भारतीय हिंदू महासभेचे दुसरे अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनी केला आहे. 

जामा मशिदीच्या मुद्द्यावरुन कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचंही चक्रपाणि महाराज यांनी म्हटलं आहे. युनायटेड हिंदू फ्रंटचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जय भगवान गोयएल यांनी दावा केला की मशिदीच्या खाली मंदिर होतं. मशिदीच्या निर्मितीवेळी अनेक हिंदू मूर्ती गाडल्या गेल्या आहेत आणि याचं सर्व्हेक्षण व्हायला हवं. 

खासदार साक्षी महाराज यांनीही केला हिंदू मंदिराचा दावा
भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनीही दिल्लीच्या जामा मशिदीखाली हिंदू मंदिर असल्याचा दावा केला आहे. यमुना नदी किनारी भगवान विष्णूचं मंदिर होतं. २००९ सालापासून जेव्हा मी आमदार होतो तेव्हापासूनच मी हे वेळोवेळी सांगत आलो आहे, असंही साक्षी महाराज म्हणाले. देशातील सर्व जाती-धर्मातील लोकांनी देशाच्या संविधान आणि न्यायालयांवर विश्वास ठेवायला हवा. ज्ञानवापी मशिदीचं सत्य अखेर समोर आलं आहे, असंही साक्षी महाराज म्हणाले.

देशातील प्रसिद्ध मशिदींपैकी एक आहे जामा मशिद
जामा मशिद देशाची राजधानी दिल्लीमध्ये असून एक लोकप्रिय मशिद आहे. लाल दगड आणि संगमरवराच्या खडकांपासून मशिद तयार करण्यात आली आहे. लाल किल्ल्यापासून अवघ्या ५०० मीटरच्या अंतरावर देशातील सर्वात मोठी मशिद असलेली जामा मशिद आहे. या मशिदीच्या निर्मितीला १६५० साली शहाजहाननं सुरुवात केली होती. मशिदीच्या निर्मितीसाठी एकूण ६ वर्षांचा कालावधी लागला होता आणि त्याकाळात १० लाख रुपये खर्च आला होता. 

Web Title: hindu organizations demanded a survey of delhi jama masjid said they will go to court with the demand of survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hinduहिंदू