शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

एकाच वेळी एकाच मांडवात पार पडला हिंदू-मुस्लीम जोडप्याचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 14:23 IST

एका हिंदू व मुस्लीम जोडप्याचा विवाह सोहळा एकाच वेळी एकाच मांडवात पार पडला. 

रोहतक- रोहतकमध्ये सामाजिक सलोख्याचं दर्शन घडलं आहे. एका हिंदू व मुस्लीम जोडप्याचा विवाह सोहळा एकाच वेळी एकाच मांडवात पार पडला. आपापल्या परंपरेची व सांस्कृतिक मुल्यांचं पालन करत हे दोन विविध जातीचे विवाह एकाच मांडवात पार पडले. रविवारी दुपारील जिंदमधील बॅन्क्वेट हॉलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. 

जिंदमध्ये राहणारे राजेंद्र कुमार व शब्बीर खान हे गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांचे शेजारी आहेत. राजेंद्र व शब्बीर यांच्या शालू आणि शबनम या दोन मुलींच्या विवाहासाठी त्यांनी रोहतक रोडजवळ असणारा बॅन्क्वेट हॉल बूक केला होता. राजेद्र यांनी 18 फेब्रुवारी संध्याकाळसाठी हॉलचं बुकिंग केलं होतं तर शब्बीर यांचं त्याच दिवशीचं दुपारचं बुकिंग होतं. 

पण शालूच्या लग्नासाठी दुपारी हॉलचं बुकिंग केल्याचा गैरसमज राजेंद्र यांना झाला. हेच डोक्यात ठेवून त्यांनी कॅटरिंग व इतर गोष्टी दुपारसाठी बूक केल्या. पण दुपारची वेळ दुसऱ्या एका लग्नासाठी दिली असल्याचं हॉलच्या मालकाने रविवारी राजेंद्र यांना सांगितलं. हॉल मालकाची माहिती ऐकुन राजेंद्र यांना धक्का बसला. सगळ्या पाहुण्यांना दुपारची लग्नाची वेळ सांगण्यात आली होती. त्यामुळे पुढे काय करणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होता. राजेंद्र यांच्या चिंतेवर शब्बीर यांनी एका मिनिटात तोडगा सांगितला. दोन्ही मुलींची लग्न एकाच मांडवात करू, असं शब्बीर यांनी राजेंद्र यांना सांगितलं. 

शब्बीर यांनी सुचविलेला पर्याय सगळ्यांसाठी अचानक होता. पण सगळ्या नातेवाईकांनी त्याला प्रोस्ताहन दिलं. सोनपट व फरिदाबादहून येणाऱ्या दोन्ही नवरदेवांच्या कुटुंबीयांनीही काही हरकत घेतली नाही. लग्न मांडवात दोन कॅटरर्स असल्याने दोन वेगवेगळ्या प्रकारचं जेवण तयार केलं होतं. पण लग्न लागल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमात मजा केली, असं शब्बीर यांनी सांगितलं.  लग्न व निकाह एकाच ठिकाणी झाल्याचं पहिल्यांदा पाहिलं. एकमेकांपासून 50 फूट अंतरावर हे दोन्ही सोहळे आनंदात पार पडले, असं राजेंद्र यांनी सांगितलं.