शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम मुलं 40वा करणार, तर हिंदू मुलं तेरावा; 6 जणांच्या कुटंबात 3 हिंदू 3 मुसलमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 14:34 IST

एका महिलेला दोन हिंदू आणि दोन मुस्लिम मुले; तिच्या मृत्यूनंतर सुरू झाला वाद. जाणून घ्या...

एका महिलेला दोन हिंदू आणि दोन मुस्लिम असे एकूण चार मुले आहेत. चकित होऊ नका, हे सत्य आहे. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील चानन ब्लॉकमध्ये हे हिंदू-मुस्लिम कुटुंब राहते. या महिलेने यापूर्वी मुस्लिम विवाह केला होता आणि त्यातून तिला दोन मुले झाली. पण, मुस्लिम पतीने तिला घटस्फोट दिल्यानंतर महिलेने ब्राह्मणाशी लग्न केले आणि तिला अजून दोन मुले झाली. अशा प्रकारे सहा जणांच्या कुटुंबात तीन हिंदू आणि तीन मुस्लिम एकत्र राहत होते. प्रत्येकजण आपापल्या परीने धर्म पाळत होता. मात्र मंगळवारी महिलेचाही मृत्यू झाला. यानंतर आजपर्यंत जे लोक एकत्र राहत होते, ते आता आईच्या अंत्यविधीसाठी आमने-सामने आले आहेत.

सुमारे 45 वर्षांपूर्वी मुस्लिम कुटुंबातील रायका खातून या मुलीचे लग्न झाले होते. मुस्लिम पतीकडून तिला मोफिल आणि सोनेलाल  नावाची दोन मुले झाली. मात्र नंतर पतीने तिला घटस्फोट दिला. यानंतर तीन राजेंद्र झा नावाच्या हिंदू व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केले. त्यांनाही मुलगा बबलू आणि मुलगी टेट्री झाली. या घरात प्रत्येकाला आपापल्या इच्छेनुसार धार्मिक कार्य करण्याची परवानगी होती. म्हणूनच राजेंद्र झा यांच्याशी लग्न केल्यानंतर रेखा बनलेल्या रायका नमाज अदा करत होत्या. त्यांची दोन्ही मुलेही नमाज पढत असत. तर राजेंद्र झा आपल्या मुला-मुलीसोबत हिंदू रितीरिवाज करायचे. यावरुन त्यांच्यात कधीच वाद झाला नाही. उलट प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार एकमेकांना सहकार्य करायचे.

पण, आईच्या मृत्यूनंतर वाद सुर झाला. वादाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी दोन्ही पक्षांना खूप समजावून सांगितले, मात्र प्रकरण मिटले नाही. शेवटी एएसपी सय्यद इम्रान मसूद आले. दोन्ही पक्षांना समजावून सांगताना ते म्हणाले की, आता ती महिला तिच्या हिंदू पतीसोबत होती, त्यामुळे अंत्यसंस्कार केले जातील, परंतु मुस्लिम मुलांची इच्छा असेल तर ते त्यांच्या प्रथेनुसार पुढील संस्कार करू शकतात. सरतेशेवटी त्या महिलेचा नवरा हिंदू असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच तिच्यावर अंत्यसंस्कार केले गेले आणि हिंदू मुलं त्यांच्या रीतिरिवाजानुसार 13वा करतील. दुसरीकडे, मुस्लिम मुलं त्यांच्या प्रथेनुसार 40वी करू शकतात. 

टॅग्स :BiharबिहारWomenमहिलाmarriageलग्नHinduहिंदूMuslimमुस्लीम