शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला गांधींकडे पोहचविण्याची तयारी; हिंदू महासभेने दिली कमल हसन यांना हत्येची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 08:32 IST

नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि राहतील. कमल हसन यांनी गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसनला दिला आहे.

मेरठ - नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता या अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण पेटले आहे. नथुराम गोडसेहिंदू दहशतवादी होता यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कमल हसन यांना हिंदू संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी सोमवारी मेरठमध्ये नथुराम गोडसे यांना दहशतवादी बोलणारे मुर्ख आणि हिंदुच्या नावावर कलंक आहेत अशी टीका केली. 

यावेळी बोलताना अभिषेक अग्रवाल म्हणाले की, नथुराम गोडसेंच्या नावावर कमल हसन यांच्याकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे. दहशतवादी कृत्यांना समर्थन देणारे कमल हसन, फारुख अब्दुला, नवज्योत सिंग सिद्धू आणि मेहबुबा मुफ्तीसारखे लोक आहे. जे दहशतवाद्यांचे रक्षण करतात असं त्यांनी सांगितले. 

तसेच सवंग लोकप्रियतेसाठी नथुराम गोडसे यांचे नाव दहशतवादासोबत जोडण्याचे काम केले त्यामुळे हसन यांच्या हत्येसाठी ते स्वत:च जबाबदार असतील. नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि राहतील. कमल हसन यांनी गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसनला दिला आहे. त्याचसोबत एआयडीएमकेकडून कमल हसन यांच्या विधानाचा निषेध करत कमल हसन यांची जीभ छाटली पाहिजे असं विधान तामिळनाडुतील मंत्री टी. राजेंद्र यांनी सोमवारी केलं. 

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादीहिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होतं अस विधान अभिनेत्यापासून नेता झालेल्या कमल हसन यांनी केलं होतं. तामिळनाडू येथील हसन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेता कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केलं. अर्वाकुरची येथील प्रचारसभेत ते बोलत होते. त्यांच्या या विधानावरुन राजकारण पेटलं आहे. त्यावेळी बोलताना कमल हसन म्हणाले होते की, पहिला हिंदू दहशतवादी नथुराम गोडसे होता. या ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम असल्यामुळे मी हे बोलत नाही तर माझ्यासमोर महात्मा गांधी यांचा पुतळा आहे त्याच्यासमोर उभं राहून मी हे सांगतोय. 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनHinduहिंदूHindutvaहिंदुत्वNathuram Godseनथुराम गोडसे